MVA sambhaji nagar rally: छत्रपती संभाजीनगरात आज (रविवारी) महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पण खरी लढत ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. (mva sambhaji nagar rally maha vikas aghadi aurangabad sabha uddhav thackeray ajit pawar maharashtra politics)
राष्ट्रावादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, औरंगाबादचे नामकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अजित पवार यांनी केले. मागील १० वर्षाचं राजकारण पाहिलं तर राज्यातील आणि देशातील नागरिकांना खुळं कोणी केली असेल तर ते भाजपच्या कमळानं केलं आहे.
आम्ही नुसती वज्रमूठ आवळली तरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. इथून पुढे महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणुका लढणार आहे. जनता या सरकारला वैतागली असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
ज्या दिवशी मविआची शेवटी सभा होईल त्या दिवशी लोक भाजपचा वर्धापन दिन एक एप्रिला केल्या शिवाय राहणार नाही. असं म्हणत धनंजय मुंडे यांनी टीका केली. तर पुढं म्हणाले, वज्रमुठ सभेची घोषणा झाली, त्यावेळी घाबरून भाजप, सेनेने यात्रा काढली, मविआची ज्या ठिकाणी सभा होणार त्या ठिकाणी त्यांची यात्रा फिरणार कारण ते घाबरले आहेत. अशी चौफेर टीका धनंजय मुंडे यांनी केली.
दरम्यान या सभेला तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभेला पाठ फिरवली पटोले यांची प्रकृती ठिक नसल्याने ते येवू शकले नाहीत असं सांगण्यात आलं मात्र, पटोलांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधान आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.