मुंबईतल्या डीलाईल रोड पुलाचं उद्घाटनं शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केल्यानं त्यांच्यावर महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना आपले आजोबा अर्थात बाळासाहेब ठाकरे यांना याचा आनंद झाला असता असं म्हटलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी सरकारला काही सवालही विचारले आहेत. (My grandfather would have been happy Aditya Thackeray reaction after case was filed)
आदित्य ठाकरे म्हणाले, "काल रात्री आणि सकाळी माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे का दाखल केलेत तर डीलाईल रोड सुरू केला म्हणून. डीलाईल रोड पूर्ण होऊन 10 दिवस झाले तरी देखील घटनाबाह्य सरकारला उद्घाटन करायला वेळ नाही. तिथे बॅरिकेड्स होते ते आम्ही बाजूला केले आणि पुढे गेलो आणि रस्ता खुला झाला असंही त्यांनी सांगितलं" (Latest Marathi News)
लोकांना अनेक वर्षे त्रास होत आहे. पण यांना उद्घाटन करण्यासाठी वेळ नाही म्हणून रस्ता बंद करण्यात आला. मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी लढत असताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
पुलाच्या कामाला एवढा उशीर का झाला? कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट का केलं नाही? असा सवालही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलो तर आमच्यावर गुन्हा दाखल करता. 'कॉन्ट्रॅक्टरमेव जयते' म्हणणारं हे सरकार आहे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
नवी मुंबई मेट्रो 5 महिने थांबवलं कारण उद्घाटनासाठी वेळ नाही. मी राज्यपालांना पत्र लिहून विनंती केली आहे की सरकारला सांगा जे काम आहे त्यावर लक्ष द्या म्हणून. काही दिवसांचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी कामावर लक्ष द्यावं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लबोल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.