Nagpur Fake Currency Case esakal
महाराष्ट्र बातम्या

Fake Currency: ''नकली नोटा चलनात आणणं दहशतवादी कृत्यासारखं'' 2015च्या केसमध्ये चौघांना १२ वर्षांची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

नागपूरः नागपुरातील विशेष एटीएस न्यायालयाने बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी चौघांना बारा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नकली नोटा चलनात आणणं हे दहशतवादी कृत्यासारखं आहे, असं न्यायालयाने नमूद केलं.

२०१५ मधील ऑक्टोबर महिन्यामध्ये शालिमार एक्स्प्रेसमध्ये बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. एटीएसने गोपनीय माहितीच्या आधारे साडेनऊ लाखांच्या नोटा जप्त केल्या होत्या. त्यावेळी एकाला ताब्यातही घेण्यात आलेलं. त्यानंतर पुन्हा तिघांना एटीएसने ताब्यात घेतलं. त्यांच्याकडूनही लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

हेही वाचाः Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

याप्रकरणी नागपूर एटीएसने तपास पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयाने आज शेख गफ्फार, शेख सत्तार, मोहद ओबेदुल्ला, मीर अन्वरुल या चौघांना बारा वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. शिवाय चौघा आरोपींना ६२ लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. देशाची अर्थव्यवस्था भ्रष्ट करण्याचा हा प्रकार असून हा प्रकार दहशतवादी कृत्यासारखा असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

ही घटना नोटबंदीच्या अगोदर घडली होती. गोपनीय माहितीच्या आधारे एटीएसने शालिमार एक्स्प्रेसमधून एकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर तीन आरोपींना नोटांसह ताब्यात घेण्यात आलेलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT