Nagpur Crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur Crime: नोकरीचे आमिष दाखवत गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार

Nagpur Crime: नोकरीच्या नावावर मध्यप्रदेशातून बोलावून सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: नोकरीच्या नावावर मध्यप्रदेशातून बोलावून, दिवसभर फिरवून शीतपेयात गुंगीचे औषध देऊन दोघांनी ३४ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पिंटू ऊर्फ रत्नदीप रतीराम गजभिये (वय ३९ रा. गाडगेबाबानगर, नंदनवन) आणि कार्तिक चौधरी (वय ५०, रा. बिनाकी ले-आऊट, यशोधरानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पिंटू हा चालक असून, चौधरी एका बियाणे विक्रीच्या दुकानात काम करतो. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. ती पतीपासून वेगळी राहत असून तिला दोन मुले आहेत. तीन वर्षांपूर्वी समाजमाध्यमावर पिंटूची तिच्यासोबत ओळख झाली. त्याने तिच्याशी मैत्री केली.

वेळोवेळी तो तिला आर्थिक मदतही करायचा. २२ जूनला त्याने पीडितेशी संपर्क साधला. नागपुरात तुझ्यासाठी चांगली नोकरी शोधली आहे, तू नागपुरात ये, असे तो म्हणाला. पिंटूने तिच्या खात्यात ऑनलाइन हजार रुपये जमा केले.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी महिला बसने नागपुरात आली. ती सीताबर्डीतील स्थानकावर उतरली. यावेळी पिंटूचा मित्र तिला घ्यायला आला. त्याने सुमारे एक तास महिलेला नागपुरात मोटारसायकलवर फिरवले. (Latest Crime News in Marathi)

त्यानंतर तो सीताबर्डी भागात पिंटूला भेटला. पिंटू हा चौधरीसोबत कारने तेथे आला होता. त्यानंतर पिंटू व चौधरीने महिलेला कारने उमरेडमधील एका रिसोर्टवर नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले.

महिला बेशुद्ध झाल्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. सकाळी जाग आल्यावर आपल्यावर अत्याचार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने पिंटूला जाब विचारला असता त्याने ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान महिला सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मैत्रिणीकडे आली. त्यानंतर पीडितने सक्करदरा पोलिस ठाणे गाठले. घटनास्थळ सीताबर्डी येत असल्याने सक्करदरा पोलिसांनी तिला सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.

महिलेने सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शोध घेऊन दोघांना अटक केली. दोघांची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT