Ganeshotsav 2023 Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ganeshotsav 2023: स्वारीवर गेलेल्या भोसल्यांना गणेशोत्सवात यायला जमलं नाही; पितृपक्षात बसवला गणपती; जाणून घ्या इतिहास...

या गणपती उत्सवाला २६७ वर्षांची परंपरा आहे. या गणपतीला मस्कऱ्या गणपतीही म्हणतात.

वैष्णवी कारंजकर

गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने सध्या सगळं वातावरण भारून गेलेलं आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झालेलं आहे, तसंच सार्वजनिक मंडळांमध्येही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. पुण्यामध्ये मानाच्या गणपतीची जशी अनेक दशकांची परंपरा आहे, त्याचप्रमाणे नागपुरातही अशी परंपरा आहे. पण या अनोख्या गणपतीची स्थापना विसर्जनानंतर होते.

२६७ वर्षांची परंपरा असलेल्या या गणपतीची स्थापना नागपूरचे राजे भोसले यांच्या राजवाड्यामध्ये होते. नवासाला पावणारा गणपती असंही मानलं जातं. काय आहे या गणपतीचा इतिहास?

१७०० च्या दशकामध्ये त्यावेळचे राजे चिमाजी भोसले यांनी बंगालवर विजय मिळवला. त्यानंतर ते नागपूरमध्ये परत आले. पण तोवर गणेशोत्सव संपला होता. चिमाजी भोसले यांनी गणरायाकडे नवस केला होता. हा नवस पूर्ण करायचा होता आणि विजयी जल्लोषही करायचा होता. त्यामुळे चिमाजी भोसले यांनी पुजाऱ्यांना विचारून हडपक्या गणपतीची स्थापना केली.

तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. पितृपक्षातल्या भाद्रपद कृष्ण चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. यामध्ये विजयाचा सोहळा साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळामध्ये विविध सांस्कृतिक कला सादर केल्या जात असत,नकला, मजा मस्करीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असे, त्यामुळे या गणपतीला मस्कऱ्या गणपती असंही नाव पडलं. तेव्हापासून या गणपतीची परंपरा सुरू आहे. आता काळानुसार या उत्सवामध्ये थोडेफार बदल झाले आहेत.

हा गणेशोत्सव पितृपक्षामध्ये साजरा केला जातो. पितृपक्षालाच वऱ्हाडी भाषेमध्ये हाडोक किंवा हडपक/हडपोक असं म्हटलं जातं. त्यामुळे या गणपतीचं नाव हडपक्या गणपती असं झालं. १७५५ पासून या गणपती उत्सवाची सुरुवात झाली. पूर्वी २१ फुटांची १२ हातांची मूर्ती स्थापन केली जात असे. पण आता २००५ पासून साडेतीन फुटांच्या आणि १२ हातांच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT