Loksabha Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Voting From Home: दिव्यांग, वृद्धांना घरुनच करता येणार मतदान, लोकसभा निवडणुकीत प्रथमच अंमलबजावणी; भरावा लागेल फॉर्म

देशभरात ईव्हीएमविरोधात सर्वच विरोधी पक्ष साशंक असताना आता दिव्यांग आणि ८० वर्षांवरील वृद्धांना घरात बसूनच ‘बॅलेट’द्वारे मतदान करता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Voting From Facility for Handicapped and Old Age Voters: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. देशभरात ईव्हीएमविरोधात सर्वच विरोधी पक्ष साशंक असताना आता दिव्यांग आणि ८० वर्षांवरील वृद्धांना घरात बसूनच ‘बॅलेट’द्वारे मतदान करता येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे धोरण आगामी लोकसभा आणि इतर सर्वच निवडणुकांत लागू करण्याचा निर्णय घेत सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत. राज्यात याची अंमलबाजणी प्रथमच लोकसभा निवडणुकीत होणार आहे. यामुळे दिव्यांग व वृद्धांच्या मतदानाची टक्केवारीत भर पडण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत दिव्यांग आणि वृद्धांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट मतदान केंद्रापर्यंत जावे लागत असे. आता त्यांच्या सुविधेसाठी हा पर्याय समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२ लाख ३२ हजार २६९ मतदारांची नोंदणी झाली आहे. (Latest Marathi News)

मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची चर्चा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची दिल्लीत कार्यशाळा सुद्धा घेण्यात आली. निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नवीन मतदार नोंदणीसोबतच मतदार यादी दुरुस्तीची मोहीम ‘मिशन मोड’ राबवण्यात आली.

मतदारांना भरावा लागणार फॉर्म

दिव्यांग आणि ८० वर्षावरील वृद्धांना या सुविधाला लाभ मिळणार आहे. यासाठी त्यांना एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. यंदा लोकसभा निवडणुकीपासून ही सुविधा भारत निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रांची संख्या वाढणार

नव मतदारांच्या नोंदणीसाठी यावेळी प्रशासनाकडून विशेष भर देण्यात आला. जिल्ह्याची मतदार संख्या २ लाख ३२ हजाराच्या घरात गेली आहे. यात २ लाख ८ हजार ३३९ मतदार आहेत. त्यातही ८८ हजार २३२ हे नव मतदार आहे. हे सर्व मतदार १७ ते १९ वर्षातील आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच १७ वर्ष वयोगटातील युवकांचीही मतदार नोंदणी करण्यात आली. मतदार यादी अंतिम करतेवेळी १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या युवकांना मतदान करता येणार असल्याचे समजते. मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भारत निवडणूक आयोगाचा विशेष भर आहे. (Latest Marathi News)

त्याच प्रमाणे मतदान ६५ टक्क्यावर नेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडूनही उपाययोजना करण्यात आहे. मागील वेळी ज्या भागात मतदान कमी झाली, त्याची कारणे शोधण्‍यात येत आहे. मतदान केंद्र घरापासून लांब असल्याने मतदार जात नसल्याचे एक कारण पुढे आले. त्यामुळे यंदा मतदान केंद्राची संख्या वाढवण्यात आली. मतदान केंद्रही प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले.

दिव्यागांना निवडणुकीसाठी घरीत मतदान करता येणार हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे मतदान वाढणार आहे. निवडणुकीबद्दल जनजागृती वाढणार असली तरी दिव्यांगानी याबद्दल सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे.-अमोल वाळके,

अध्यक्ष, अपंग भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT