Nana Patole sakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : कोरोना योद्धा

Nana Patole : कोविड-१९ साथीच्या काळात महाराष्ट्रात नाना पटोले यांनी स्थलांतरित कामगारांना मदत केली, अन्नधान्याच्या किटचे वाटप केले आणि ग्रामीण भागात कोविड सेंटर उभारले.

Anuradha Vipat

२०२० साली कोरोना विषाणूमुळे एक जागतिक साथ निर्माण झाली तेव्हा भारतातही लाखो लोकांना स्थलांतरापासून, उपासमारीपर्यंत अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागलं होते. पण या भीषण परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कौशल्याने व सजगपणे परिस्थिती हाताळली गेली. सरकारने आणलेला धारावी पॅटर्न असो किंवा शिवभोजन असो, परंतु महामारीची परिस्थिती कुशलतेने हाताळली गेली.

महाराष्ट्रात शिक्षण व रोजगारासाठी अनेक लोक गावांवरून शहराच्या दिशेने स्थलांतर करतात. पण २३ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे लाखो लोक आपल्या घरापासून लांब विविध शहरांमध्ये अडकले.  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघातून रोजगार व शिक्षणासाठी स्थलांतरित झालेल्या लोकांना पुन्हा सुखरूप आपापल्या गावी पोहोचवण्याचे काम केले. तसेच अचानकच लॉकडाऊन लागल्याने बऱ्याच लोकांकडे अन्न पुरवठ्याची कमतरता होती.

नाना पटोलेंना हे लक्षात येताच त्यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तांदूळ, गहू, तेल, साखर, इत्यादी गोष्टींच्या किटचे वाटप सुरु केले. तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ होताच त्यांनी दोन्ही जिल्ह्यात एक नवीन यंत्रणा राबवली. त्यात नाना पटोले स्वतः काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना हाती घेऊन रुग्णांना दवाखान्यात भरती करण्यापासून त्यांचा संपूर्ण उपचार करून देत असत. सर्वांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती.  

नाना पटोलेंनी लाखांदूर, लाखनी व साकोली येथे कोविड सेंटर उभे केले. तेथे गावातील लोकांवर त्वरित उपचार सुरु झाले. दर आठवड्याला ते या सेंटरला भेट देत व सर्व गोष्टींचा आढावा घेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा तणाव निर्माण होऊ लागला, आवश्यक असलेली साधन सामग्रीदेखील अपुरी पडत होती.

मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या रूग्णसंख्येमुळे सामग्री व आरोग्ययंत्रणेत वाढ होणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून नाना पटोलेंनी व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, आयसीयू बेड, हॉस्पिटल बेड, फार्मास्युटिकल फ्रिज, व्हॅक्सिन बॉक्स आणि आवश्यक तितक्या साधनसामग्रींचा पुरवठा केला. त्याचसोबत मोफत अँब्युलन्स सेवा सुरू केली.

कोविड काळात सर्वात जास्त मागणी ऑक्सिजनची होती. या शिवाय लोकांवर होत असलेल्या उपचारात खंड पडत होता. त्यासाठी त्यांनी त्वरित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची तरतूद केली व उपचारासाठी ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. त्यांनी कोविड विरुद्ध लढाईसाठी चोवीस तास आरोग्य सेवा यंत्रणा सुरू केली. या यंत्रणेत महिला व युवा काँग्रेस कार्यकर्तेसुद्धा आरोग्य सेवेस सज्ज झाले.

जागतिक साथीमुळे लोकांच्या मनात भीती खूप वाढली होती. कुटुंबातील व्यक्ती असूनही लोकांना एकमेकांमध्ये अंतर ठेवावं लागायचं. त्यामुळे लोकांचं मनोबल कमी झालं. त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ लागलं. कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.

राज्य सरकारकडून कोविड लसीकरणाची सोय गावागावात उपलब्ध झाली होती. लोकांची रूग्णालयात जाऊन लस घेण्याची हिम्मत होत नव्हती. नानांनी एक शक्कल लढवली. पूर्व विदर्भातील लोकांचा नानांवर अतोनात विश्वास. नाना स्वतः लसीकरण केंद्रात गेले व त्यांनी कोविड १९ चे लसीकरण करून घेतलं.

"लस अगदी सुरक्षित आहे, त्याचे काहीच दुष्परिणाम नाहीत. तेव्हा आपण लवकरात लवकर नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे' असे त्यांनी लोकांना पटवून दिले. पूर्व विदर्भातील लोकांचा यावर विश्वास बसू लागला व नानांनी केलेले आवाहन स्वीकारत त्यांनी लसीकरण करून घेतले. या लढ्यात सरकारने दिलेले सर्व निर्बंध पाळत नाना पाटोळे यांनी आपले समाजकार्य सुरूच ठेवले.

"कोरोनाविरुद्ध लढत असताना नागरिकांनी सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करावे आणि आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी तसेच ब्रेक द चेन मध्ये घालून देण्यात आलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करावे व शासनाला सहकार्य करावे " असे आवाहन पटोले यांनी संपूर्ण महाराष्ट्राला केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT