Nana Patole slam rss over DRDO scientist Pradeep kurulkar Honeytrap espionage case  
महाराष्ट्र बातम्या

RSS News : "कुरुलकर सांगतोय की चार पिढ्या आरएसएसशी जोडलेलो आहोत, मग…"; हनीट्रॅप प्रकरणी काँग्रेसचा निशाणा

रोहित कणसे

डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याच्या हनी-ट्रॅपिंग प्रकरणाचा तपास सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करत आहे. या तपासात आत्तापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दरम्यान कुरुलकर याने संवदेनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा संशय एटीएसला आहे. यादरम्यान काँग्रसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) आणि भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. (Nana Patole slam rss over DRDO scientist Pradeep kurulkar Honeytrap espionage case)

हनीट्रॅप प्रकरणात अडकलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सांगतात की, त्यांचे चार पीढ्या आरएसएशशी सलग्न आहेत, यावर संघाने उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, "कुरुलकर हे आरएसएसशी संबंधीत आहेत. आरएसस हे वैचारिक संस्था आहे. अशा पध्दतीने आरएसएसचा व्यक्ती देशाची माहिती पाकिस्तान या शत्रूराष्ट्राला देत असेल तर यावर आरएसएसने उत्तर दिलं पाहिजे."

पटोले पुढे बोलताना म्हणाले की, "आरएसएसवाले आमचा काही संबंध नाही असे सांगतात. करुलकर जो आरएसएससाठी भाषण करत होता, तो स्वतः सांगतोय की माझी चौथी पीढी आहे जी आरएसएसशी जोडली गेलेली आहे आणि आता आरएसएसकडून उत्तर येतंय की, त्याचा आणि आमचा संबंधच नाही. नेमकं काय वास्तविकता आहे ती आरएसएसने मांडली पाहिजे."

"आरएसएसमध्ये सत्य बोलणारे लोकं आहेत त्यांनी सत्य मांडलं पाहिजे. विध्वंस लोकं, देशाला बरबाद करणारी व्यवस्था ज्या माध्यमातून तयार झाली, त्यावेळेस आरएसएसला आणि केंद्रातील सरकारला ते महिती नव्हतं का? या प्रश्नांची उत्तरे आरएसएस आणि केंद्रातील सरकारने द्यावीत"असे नाना पटोले म्हणाले आहेत .

दरम्यान महाराष्ट्र एटीएस अधिकारी कुरुलकरच्या अधिकृत परदेश दौऱ्यांची चोकशी करत आहेत आणि त्यांना संशय आहे की तो पाकिस्तानी महिलेला भेटला असावा जी त्याच्याकडून व्हॉट्सअॅपद्वारे गुप्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत होती. या परदेशी दौऱ्यांवर असताना कुरुलकर ट्रेकिंगसारख्या अनेक गोष्टी केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अद्याप अनेक खुलासे होणे बाकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT