मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर शुक्रवारपासून लोणावळा येथे सुरू झाले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या शिबिराचे उद्घाटन झाले. तसेच महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी शिबीराला मार्गदर्शन केलं.
शुक्रवारी लोणावळ्यात सायंकाळच्या वेळी हलक्याफुलक्या सत्रामध्ये काँग्रेस नेत्यांच्या एका टीमने गाणं गायलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना इतरांनी सोबत केली. गाणं होतं-
तेरे बगैर जहाँ में कोई कमी सी थी
भटक रही थी जवानी अंधेरी राहों में
सुकून दिल को मिला आ के तेरी बाहों में
मैं एक खोई हुई मौज हूँ तू साहिल है, जहाँ भी...
तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है
हे गाणं गाताना काँग्रेस नेत्यांचा सूर हरपल्याचं लक्षात आलं. म्युझिक एकीकडे आणि गाणं दुसरीकडे, अशी अवस्था पहायला मिळाली. याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. यावेळी नेटकऱ्यांना अशोक चव्हाणांची आठवण झाली. त्यात पुन्हा गाणं विरह रसयुक्त असल्याने सोशल मीडियात जास्तच उमाळा दाटून आला होता.
दोनच दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. त्यांनी अचानक काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि विधीमंडळ सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.
प्रवेशानंतर भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे, नारायण राणे यांना टाळून भाजपने नवख्या चव्हाणांना राज्यसभेची संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शनिवारी सकाळच्या सत्राचे अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे होते. पहिल्या सत्रात ॲड. असिम सरोदे, अशोककुमार पांडे, वर्षा गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, के. सी. वेणुगोपाल यांनी मार्गदर्शन केलं.
दुसऱ्या सत्राच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे होत्या. तर विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन केलं. नाना पटोले आणि रमेश चेन्नीथला यांच्या भाषणाने शिबिराचा शेवट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.