देगलूर : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृवाखालील भारत जोडून यात्रा महाराष्ट्राच्या सेमी लागत दाखल झाली असून ती देगलूर जिल्हा नांदेड येथे महाराष्ट्रातील प्रथम तालुक्यात प्रवेश करायला काही तासाचा अवधी शिल्लक असताना शहरवासीयांबरोबरच तालुक्यातील जनतेत मोठा उत्साह दिसून येत आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते शहरात दाखल व्हायला सुरुवात झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी के एच पाटील व श्री संपत कुमार आयसीसीचे लेणीताई जाधव हे हैदराबाद वरून देगलूरत दुपारी दाखल झाले. यावेळी त्यांनी शहरातील विविध स्थळांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसर, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राहण्याची जिथे सोय करण्यात आली.
तेथील निजी कक्षाची भोजन कक्षाची, त्यांनी पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार अमर राजूरकर आमदार जितेश आंतापूरकर ,तालुका अध्यक्ष ऍड प्रीतम देशमुख हाणेगावकर, माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर ,माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, शंकर कंतेवार, रूपेश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी नगरसेवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भारत जोडो यात्रा दुपारी लछनगेट मंडळ मदनुर जिल्हा कामारेडी येथे आली असून सायंकाळी चार वाजता मेनूर मंडळ मदनुर येथे आगमन होणार असून तेथे त्यांची सभा होईल. त्यानंतर ते महाराष्ट्र सीमेकडे रवाना होतील. मेनूर ते देगलूर अंतर २० कि.मी च्या आहे.
त्यामुळे भारत जोडो यात्रा देगलुरात यायला सायंकाळी सात ते आठ वाजतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देगलूर मध्ये आगमन झाल्यानंतर त्यांच्या यात्रेचे भव्य स्वागत केल्यानंतर राहुल गांधी नागरिकांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर ते भोजन करतील व रात्री दहा वाजता देगलूर येथून मशाल रॅली घेऊन ते वन्नाळी ता. देगलूर येथील गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी रवाना होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
त्यानंतर रात्री उशिरा त्यांचे पुन्हा देगलूर मध्ये आगमन होईल व त्यांचा देगलूर उदगीर रोडवरील गुरु गुंडाधाम मैदानावर मुक्काम राहील. राहुल गांधी हे सध्या मेनूर येथे आराम करीत असल्याच्या व्रताला मदनुर चे माजी आमदार श्री गंगाराम यांनी दुजाेरा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.