Rajkot Fort Malwan: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले आहेत. शाब्दिक वार तर सुरुच आहे. परंतु मागच्या आठवड्यात राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं होतं. त्या दिवशी नेमकं काय झालं आणि जयंत पाटलांनी कशी मध्यस्थी केली, याचा किस्सा खुद्द नारायण राणेंनी सांगितला आहे.
सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे म्हणाले की, मी त्या दिवशी पुतळा पहायला गेलो होतो. तिथे दहा-बारा मिनिटं थांबलो. लगेच मी तिथून माझ्या घरी जायला दुसऱ्या रस्त्याने निघालो.. मध्ये महादेवाचं मंदिर आहे. नमस्कार करायला थांबलो, तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले.. काय विजय कसं काय, अशी मी त्यांची चौकशी केली. त्यावर त्यांनी काय नाही दादा कसे आहात तुम्ही.. असं उत्तर दिलं.
राणे पुढे म्हणाले, विजय वडेट्टीवार गेल्यानंतर अजून दोन मिनिटं मी पुढे गेलो. तेवढ्यात एक आवाज आला. काही लोक घोषणा देत पुढे येत होती. मी चौकशी केली, कोणय? तर ते आदित्य ठाकरे होते. मी एसपींना म्हटलं, तुम्ही परवानगी नाही द्यायला पाहिजे. मी गेल्यानंतर द्यायला पाहिजे. एकावेळी एकाला परवानगी द्यायला पाहिजे होती. मी ऑफिशिअली पत्र दिलं होतं.. त्यांनी तिथे रितसर जायला पाहिजे. दुःखद घटना आहे परंतु ते घोषणा देत जात होते.. हमसे जो टकराएगा.. अशा घोषणा देत होते.
''मी म्हटलं एसपी साहेब, हे वापस जाणार नाहीत.. आपला हूकूम आहे.. आणि मी एकदा नाही म्हटलं तर नाहीत जाणार. त्यानंतर हे सगले दोन तास एकाच जागेवर बसले होते. मधून मधून फोन येत होते. आदित्य उठून जायचा लांब आणि बोलायचा. आमचे मित्र जयंत पाटील आले, दादा मोठं मन करा ना? जाऊ द्या.. मी म्हटलो, मी या रस्त्याने चाललो तर तुम्ही आक्रमण करत येता.. जाऊ देणार नाही. जयंत पाटील तिसऱ्यांदा आले.. दादा जाऊ द्याना. मी म्हटलं जयंत मी परवानगी देईन, पण बाजूने जेवढी जागाय ना तेवढ्यातून जाययं. तेही खाली मान घालून.. वर मान नाय करायची.''
''वर मान केली अन् काही झालं तर माझी जबाबदारी नाही. हे जयंत पाटलांनी मान्य केलं.. मग एक-एक जण मान खाली करुन जात होता. वरती मान कुणाची झालीय नाही.'' असा किस्सा नारायण राण यांनी सांगितला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.