narayan rane sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: 'मराठा आरक्षणासंबंधी सरकारच्या निर्णयाशी मी सहमत नाही, कारण...'; नारायण राणेंनी स्पष्ट केली भूमिका

Maratha Reservation Latest News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर शनिवारी (२७ जानेवारी) नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले आहेत.

रोहित कणसे

Maratha Reservation Latest News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर शनिवारी (२७ जानेवारी) नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले आहेत. मनोज जरांगे पाटील देखील मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहचले. दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.

भाजपचे नेते केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी देखील सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मराठा समाजाचे खच्चीकरण करणारा असल्याचे तसचे यामुळे मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याचे राणे म्हणाले आहेत.

"मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन." असे नारायण राणे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT