Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: मोदींच्या नवभारताचा मार्ग महाराष्ट्रातून जातो; डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर फडणवीसांचे भाष्य

Sandip Kapde

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जपानमधील कोयासान विद्यापीठाकडून गौरव करण्यात आला. त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली. पदवी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोयासान विद्यापीठाचे आभार मानले. अशा विद्यापीठातून पदवी मिळणे हे माझे भाग्य आहे. जपानी विद्यापीठं आणि माझं नातं नियतीनं आखलेलं आहे. माझ्याकडे आज शब्द नाहीत. यापूर्वी ओसाका विद्यापीठाकडून मला पदवीचा प्रस्ताव होता पण काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी दिक्षाभूमीच्या शहरातून येतो हे माझ्य भाग्य आहे. भारत आणि जपानची मैत्री महत्वाची आहे. या दोन्ही देशामध्ये सांस्कृतिक मैत्री आहे. जपानने महाराष्ट्राला सतत मदत केली आहे. मुंबई मेट्रो ३ साठी जपान सरकारने आपल्याला २० कोटींचे कर्ज दिलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या वाटचालीत जपानचा मोठा वाटा आहे. कोयासान विद्यापीठ १२०० वर्ष जुनं आहे. त्या विद्यापीठातून मला पदवी मिळणं, हे माझ्यासाठी भाग्य आहे. आपण नेहमी म्हणतो जगाला युद्ध नको बुद्ध हवा. गौतम बुद्धांचे विचार दोन देशांना जवळ आणतात. मी दिक्षाभूमीच्या शहरातून येतो मला अभिमान असल्याचे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूर नियंत्रणासाठी आपण जपानकडून आपण विकसित तंत्रज्ञान आणत आहोत. परकिय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन आहे. आता स्टार्टअपची कॅपीटल आता हैदराबाद, बंगळुरु नाही तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. हे असमित ताकदीचं राज्य असल्याचे फडणवीस म्हणाले. मोदींच्या नवभारताचा मार्ग महाराष्ट्रातून जातो.

ही डॉक्टरेट मी जनतेला समर्पीत करतो. हे कार्य मी करु शकलो. कारण राज्यातील जनतेचे आशिर्वाद सोबत होते. सहकाऱ्यांची साथ होती. वरिष्ठांची साथ होती, असे फडणवीस म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs New Zealand: भारतीय फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांचा कस लागणार, न्यूझीलंडच्या खेळाडूनंच दिला सावधानतेचा इशारा

Manoj Jarange: ''फडणवीस साहेब, तुमचं विधानसभेचं गणित बिघडणार..'' मनोज जरांगेंचा इशारा; सरकारला नवा अल्टिमेटम

Chandrasekhar Bawankule: मंत्रिमंडळात चर्चा न करताच संस्थेला भूखंड दिल्याने वाद; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली प्रतिक्रिया

Latest Maharashtra News Updates : मुंबई-पुण्यात जोरदार पावसाची हजेरी! नागरिकांची तारांबळ

Ishan Kishan घेणार ऋषभ पंतची जागा, IND vs BAN मालिकेसाठी टीम इंडियात होणार पुनरागमन?

SCROLL FOR NEXT