Ajati Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिपदासाठी तटकरे-पटेलांमध्ये वाद? दोन नेत्यांच्या भांडणात अडकलं अजित पवार गटाचं मंत्रिपद, नेमकी चर्चा काय?

Sandip Kapde

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये मंत्रिपदावरुन वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवास्थानी आज अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्याची बैठक पार पडली. या बैठकीत सुनील तटकरे मंत्रिपदावर ठाम होते. लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांना मंत्रिपद मिळावं, अशी भूमिका तटकरे यांनी घेतल्याचे समजते.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील वाद मिटला नसल्याची माहिती साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे दोन नेत्यांच्या वादात अजित पवार गटाचं मंत्रिपद अडकलं का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्हाला भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता. मी पूर्वी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रि‍पदावर राहिलो आहे. त्यामुळे राज्यसभा स्वतंत्र प्रभार हे घेणं, मला योग्य वाटलं नाही. अनेक राजकीय पक्षांना सोबत घेऊन निर्णय घ्यायचा असतो. शिवसेनेचे सात खासदार निवडून आले त्यानुसार त्यांना सूचना मिळाल्या. आम्हाला देखील सूचना मिळाल्या.

थोडी धीर ठेवा हे आम्हाला सांगण्यात आले. महाराष्ट्रात शिवसेना तुल्यबल समजून निर्णय घेतला असावा. तटकरे-पटेल असा काही वाद नाही. माझ्या नावार पक्षाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे पटेल म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT