Narendra Modi praised by Eknath Shinde ESakal
महाराष्ट्र बातम्या

मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

Vrushal Karmarkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ‘पीएम विश्वकर्मा’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केल्याचे दिसून आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे विकासाचे तिसरे आदर्श आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीचा आलेख तिप्पटीने वाढेल असा विश्वास आहे. जगातील सर्वात ताकदवान देशांच्या यादीत भारत वरच्या ठिकाणी असेल. कारण देशात सत्तेवर नरेंद्र मोदी आहेत. ब्रँडिंग व मार्केटिंग मध्ये छोट्या छोट्या घटकांना सामावून घेण्याचा विचार त्यांनी सत्यात आणला. मोदीजी प्रत्येक विभाग व क्षेत्रास मुख्य प्रवाहात आणत आहेत, असं ते म्हणाले.

लोकांना रोजगार देण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे. विश्वकर्मा योजनेतून लाखो लोकांना मदत झाली आहे. सब का साथ, सब का विकास हा त्यांचा हेतू आहे. या योजनेच्या वर्षपूर्ती निमित्ताने मी त्यांचे आभार मानतो. महिलांना त्यांनी सन्मान मिळवून दिला आहे. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्ट अप योजना सुरु करत आहे. महिलांना १ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. टेक्सटाईल प्रकल्प हा ८ हजार कोटींचा प्रकल्प आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराचा मेकओव्हर होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, तिसऱ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेत आहोत. जगभरात देशाचा मान मोदींनी वाढवला, तसेच दहशतवादी निधीला त्यांनी रोख लावला. पण आपल्यातले काही लोक बाहेरील देशात जाऊन देशाची बदनामी करत आहे. संविधान रद्द करण्याची भाषा बोलत आहेत. पण नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत तोपर्यंत कुणी मायका लाल बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण रद्द करू शकत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, वन नेशन वन इलेक्शनच्या निर्णयाचे स्वागत करतो. काही जण काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करण्याची भाषा करत आहेत. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही महिन्याला दीड हजार रुपये जमा करत आहोत. मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा विकासाच्या नव्या स्तरावर पोहोचतो आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने महाराष्ट्राचा विकास मोदींच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या पाठीमागे मोदीजी खंबीरपणे उभे आहेत, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT