Nashik CA Intermediate : सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात आला आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टडस् अकाउंटटस् ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे सुधारित तारखांची घोषणा केली असून, १७ मेपूर्वी इंटरमिजिएट आणि फायनल या स्तरावरील परीक्षा आटोपल्या जाणार आहेत. नुकताच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू आहे. (nashik CA Intermediate Final exams will be completed before 17 May marathi news)
पाच टप्प्यात निवडणूकप्रक्रिया पार पडणार असल्याने या कालावधीत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील घेण्याचे नियोजित आहे. मतदानाच्या दिवशी येणाऱ्या परीक्षांचे फेरनियोजन केले जाते आहे. त्यानुसार सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखांत बदल केला जाणार असल्याचे असोसिएशनने काही दिवसांपूर्वी घोषित केले होते. त्यानुसार मंगळवारी (ता. १९) रात्री उशिरा सुधारित तारखांची घोषणा केली आहे.(latest marathi news)
अशा आहेत सुधारित तारखा -
इंटरमिजिएट स्तरावरल शिक्षणाच्या ग्रुप-एकची परीक्षा ३, ५ व ९ मे असे तीन दिवस घेतली जाईल. ग्रुप दोनची परीक्षा ११, १५ आणि १७ मेस घेतली जाणार आहे. फायनल अर्थात अंतिम परीक्षा ग्रुप एकसाठी २, ४ आणि ८ मेस आणि ग्रुप दोनसाठी १०, १४, आणि १६ मेस घेतली जाणार आहे.
आता वर्षातून तीनदा आयोजन
‘आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए रणजितकुमार अग्रवाल यांनी शिक्षणक्रमातील बदलांविषयी माहिती राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान दिली. त्यानुसार इंटरमिजिएट आणि फाउंडेशन या स्तरावरील परीक्षा आता वर्षातून तीन वेळा घेतल्या जातील. जानेवारी, मे-जून आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये परीक्षांचे आयोजन केले जाईल. यापूर्वीपर्यंत या परीक्षा वर्षातून दोन वेळा होत होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.