महाराष्ट्र बातम्या

राणेंच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार कायम

नामदेव कुंभार

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभर अभूतपूर्व महा‘राडा’ झाला. एकीकडे शिवसेना भाजपचे कार्यकर्ते रस्त्यांवर परस्परांना भिडले असताना राज्य सरकारने राणे यांना अटक केली. या घटनेचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तीव्र पडसाद उमटले. पोलिसांनी राणे यांना रात्री उशिरा महाड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुमारे सव्वा तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, त्यांच्या अडचणी संपताना दिसत नाही. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दोन सप्टेंबर रोजी हजर राहण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे. हजर न राहिल्यास अटक करण्यात येईल, असेही नाशिक पोलिसांनी सांगितलेय.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंततर राज्यात शिवसैनिकांचा संताप झाला होता. या प्रकरणी नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी नाशिक पोलिसाचं पथक त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीला पोहचलं होतं. महाड पोलिसांनी राणे यांना अटक करुन कोर्टात हजर केलं होतं. यावेळी नाशिक पोलिसांनी राणे यांना हजर राहण्याचा समन्स दिला आहे. नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.

तपास आधिकारी अनंद वाघ यांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली. दोन सप्टेंबर रोजी नारायण राणे यांना आपली बाजू मांडण्यासाठी नाशिक सायबर पोलिस स्थानकात हजर राहा, असं यामध्ये म्हटले आहे. नारायण राणे यांनी यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. नाशिकशिवाय, पुणे आणि औरंगाबादमध्येही राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते राणे?

राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती,’’ असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? -

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. यावेळी त्यांच्यामागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT