Nashik Water Crisis : कहाणी आहे नाशिकपासून ८० किमी अंतरावर असलेल्या डोंगरात २०० लोकांच्या वस्तीतल्या जांबूनपाड्यातील प्रत्येक महिलेची. इथल्या प्रत्येक महिलेच निम्म आयुष्य हे पाणी भरण्यात जात आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात त्यांनी तेथील एका महिलेची कहाणी जाणून घेतली.
सुनीता खुताडे ही महिला याच पाड्यातली आहे. ती सांगते जर ती पहाटे ४ वाजता उठली नाही तर दिवसभर पाणी मिळणं फार कठीण होऊन बसतं. त्यामुळे तिचा दिवस सुर्योदयाच्या खूप आधी सुरू होतो. सकाळी उठून मुखमार्जन करून ती लगेच दोन कळशा पाण्याच्या शोधात घराबाहेर पडते. पाण्याचा शोध गावाबाहेर घ्यावा लागतो.
एका लहानशा खड्ड्यात उतरून तिथे सपाट ताटाने भरता येईल असा आणि एवढाचा पाण्याचा स्रोत आहे. मोठ्या कष्टाने त्या खड्ड्यात उतरल्यावर तिथे झोपलेल्या एका वृद्ध महिलेने तिला मारहाण केली तेवढ्यात ते पाणीही संपले. पण सुनीताने हार न मानता ते पाणी परत भरण्याची वाट पाहिली आणि १ तासानंतर कसेबसे अर्धे भांडी पाणी भरले.
तेवढंच पाणी घेऊन ती घरी जाते कारण मागून इतर बायक्यांच्याही तिथे पाणी भरण्यासाठी रांगा लागलेल्या असतात. ती भांडी घरी ठेवते आणि मग पुन्हा जंगलात इतर कुठे पाण्यचा बारीकसा स्रोत सापडतो का याच्या शोधात ती निघते. ती रोज किमान १० तास पाण्याभोवती घालवते. त्यातले ६ तास पाणी शोधून भरण्यासाठी आणि ४ तास घरी जाण्या येण्यासाठी.
ती सांगते गेल्या 11 वर्षांपासून माझा संपूर्ण दिवस पाण्याभोवती फिरत आहे. आम्ही या खड्ड्यांकडे एकमेकांच्या विरोधात धावतो, शॉर्टकटने टेकडीवर चढतो, जागा बुक करण्यासाठी तिथे झोपतो - हे सर्व खूप थकवणारे आहे. त्यांची मुले बाळेही त्यांच्या सोबत पाण्यासाठी वणवण करत असतात.
ही वणवण दुपारच्या ४० डिग्री तापमानातही सुरूच असते. कुठे गढूळ पाणी मिळते. मग ते गाळून स्वयंपाकासाठी वापरले जाते. त्यानंतर ताटं धुतलेलं पाणी ते घर सारवण्याच्या शेणासाठी, मातीसाठी, झाडांसाठी वापरतात.
सुनीता सांगते 'दीर्घ प्रतीक्षा असूनही आम्ही जवळच्या पाण्याच्या स्त्रोताला प्राधान्य देतो कारण इतर ठिकाणे दूर आहेत आणि पहाटे आणि रात्री उशिरा जंगलात एकटे जाणे धोकादायक आहे.'
या त्रासाला वैतागलेली सुनीता जिथे मुबलक पाणी आहे अशाच ठिकाणी मी माझ्या मुलींचे लग्न करेन असं सांगते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.