Environment 
महाराष्ट्र बातम्या

पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गशिक्षण!

डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ, बारामती

जगाच्या पातळीवर विचारमंथन करावे तर स्थानिक पातळीवर कृती करावी, हा संदेश आपण सर्वजन विसरून चाललो आहोत. आता जगाला युद्धाची नव्हे तर गौतम बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मला नमूद करावेशे वाटते. कारण आता जे समोर दिसत नाही अशा विषाणू व जीवाणूशी आपले युद्ध सुरू असून यातून फक्त आपल्या जीवनशैलीत बदल करणे अत्यावश्‍यक आहे. अगदी महात्मा गांधींच्या विचारांची नितांत गरज असून, हा विचार म्हणजे पृथ्वी माणसाची गरज भागवू शकते मात्र हाव नाही, हा विचार यापुढील जीवनात अमलात आणलाच पाहिजे, अशी आजची पृथ्वीवर जगणाऱ्या भटक्‍या मानवाची अवस्था आहे. 

नैसर्गिक अधिवास नष्ट झाले तर प्राण्याकडून माणसाकडे अनेक साथीचे आजार येणार, आजपर्यंत अत्यंत बलवान असलेली मानवजात आता इतिहासजमा झालेली आहे. याला कारण आजची आपली चंगळवादी जीवनशैली. अगदी न्यूयॉर्क व इटलीसारखी शहरं कोरोनामुळे जगात सर्वाधिक बाधित झालेली आहेत. खरंतर इथला विकास कारणीभूत असल्याची चर्चासुद्धा नाही, हे नवल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आपलीच महाराष्ट्र राज्यातील दोन शहरे मुंबई आणि पुणे सर्वाधिक बाधित आहेत. याचा दोष मी शासन व्यवस्थेला देणार नाही, मात्र या दोन शहरात प्रदूषण, वाढती झोपडपट्टी, इमारती, रस्ते, जंगलतोड, नैसर्गिक अधिवास नष्ट करणे, डोंगरफोड करणाऱ्या सर्वच मानवी व्यवस्थेला देणे गरजेचे आहे. या दोन शहरांत पर्यावरण व निसर्गाचे तीन-तेरा कधीच वाजले आहेत. हे आपण विसरून गेलो की काय? पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते की, एक पूर्ण विभाग जंगल संरक्षण करण्यासाठी सतत काम करत आहे, मात्र एवढे काम करूनही जंगल दरवर्षी नष्ट होण्याचा वेग वाढतोय, हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच नव्हे का? 

कोविड १९ या विषाणूने जगभर थैमान घातले असून आता अनेक विषाणू येतील अशी सूचना जगभरातील शास्त्रज्ञ देत आहेत. आता मात्र जगभरात नैसर्गिक अधिवास झपाट्याने नष्ट होत आहेत, याचा तात्काळ परिणाम फक्त इतर जीवांवर होईल, मात्र गंभीर परिणाम मानवी जीवनावर होणार आहेतच, हे १०० टक्के खरे ठरत असून आता तरी आपण सावध भूमिका घेणार आहोत का नाही यावर आपले पुढील भविष्य निर्भर असेल, अशी सर्व शास्त्रज्ञांनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यामुळे त्यातील असंख्य जीव बेघर होत आहेत, यातील बहुसंख्य जीव आपले अधिवास सोडून जाताना दुसऱ्या अधिवासात असणाऱ्या जीवांशी होणाऱ्या संघर्षात अनेक विषाणू व जीवाणू दुसऱ्या प्राण्यात प्रवेश करीत आहेत. या प्रकियेत अगदी १० साथीच्या रोगातील ६ रोग तर या प्रक्रियेत माणसापर्यंत अगदी सहजपणे येत आहेत. ही जीवघेणी प्रक्रिया अत्यंत वेगाने पसरत असून आता जर मानवाने आपल्या जीवनशैलीत बदल केला नाही तर निसर्ग आपल्याला माफ करणार नाही, किंबहुना नैसर्गिक अधिवास नष्ट करण्याचा वेग मानवाने थांबविला पाहिजे, अन्यथा मानवजात अत्यंत वेगाने नष्ट होईल. अगदी शेतीसाठी जंगलावर अतिक्रमण, वाढते शहारीकरण, मोठे रोड, वन्यजीवांचे व्यापार, तसेच वन्यजीवांचे निवारा, अन्न, पाणी शोधात भटकंती आणि त्यामध्ये त्यांच्या शरीरातील विषाणू व जिवाणूंचे माणसामध्ये होणारा प्रसार आणि मग कोरोनासारखी महामारी.

भारत जैवविविधता प्रधान देश आहे. यामुळे आपल्या भागात अनेक प्रकारची नैसर्गिक जंगले व वन्यजीव आहेत. ही खूप आनंद व समाधान देणारी बाब आहे. मात्र आजही आपण विकासाच्या गर्तेत गर्क आहोत. हे रोखायचे असल्यास आपल्याला नैसर्गिक गवताळ माळराने वाचवायला पाहिजेत. नैसर्गिक अधिवास मजबूत असतील तर सर्व विषाणू व जीवाणू त्याच अधिवासात शांतपणे जगतात, शिवाय एकाच प्रजातीमधून पुढे पुढे प्रवास अतिशय शांतपणे सुरू असतो, मात्र अधिवास कमकुवत झाले की मग हा प्रवास खंडित होऊन हे विषाणू व जीवाणू दुसऱ्या प्रजातीच्या शरीरात प्रवेश करतात आणि मग विनाश होतो. निपाह व हेन्द्रा हे विषाणू प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगलतोड, याचा परिणाम वटवाघळाची वस्तीस्थाने व खाद्याची झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेली आणि मग फलहारी वटवाघळांना आपला मोर्चा मानवी वसाहतीमधील फळ झाडाकडे वळवावा लागला. परिणामी मानव व वटवाघूळ संबंध वाढत चालले आहेत. ही बाबसुद्धा धोकादायक असल्याचे नमूद करावेसे वाटते.

पर्यावरण शिक्षण प्रकल्प भविष्यातील मानवी अस्तित्वाची गरज आहे, कारण पर्यावरण शिक्षण म्हणजे निसर्गशिक्षण, ज्यातून आपल्या परिसरातील पर्यावरण आणि निसर्ग याचे नाते अतूट असल्याचे दिसून येते. पर्यावरण विषय हा सक्तीचा करून या विषयाचे तज्ज्ञ विषयशिक्षक नेमून हा विषय शिकवीने गरजेचे आहे. हा विषय शिकविताना मुलांना निसर्गात घेऊन गेले पाहिजे आणि निसर्गाशी हितगुज करणे महत्त्वाचे असेल. निसर्गाशी हितगुज केली तरच मुलांना निसर्गातील विविध सजीव आणि निर्जाव यांचे आविष्कार समजतील, अर्थात आपल्या परिसराची स्थानिक जैवविविधता मुलांना लहान वयातच कळणे गरजेचे आहे. मुलांना लहानपणीच निसर्गात, डोंगरावर, नदीकाठी, तलावाकाठी, जुनी मंदिरे, अभयारण्ये, घनदाट जंगले, माळराने, समुद्र किनारे, विविध पर्वतांवर घेऊन गेले पाहिजे तरच मुलांना निसर्ग आणि त्याचे पवित्र कळेल आणि यांचा परिणाम म्हणजे निसर्गाशी त्यांचे नाते घट्ट होऊन निसर्ग संवर्धन होईल. 

आपल्या घराभोवती असणारी छोटी पाणथळ, गावाभोवती असणारे ओढे, येळ, बारव, पाणवठे, नदी वाचविले पाहिजेत. नदीच्या पात्रात कधीही निर्माल्य टाकू नये हे सांगावे लागते हीच शोकांतिका आहे. नदी म्हणजे कचराकुंडी नव्हे हे जगाला ओरडून सांगायला हवे. नाहीतर पुढील पिढी नदी म्हणजे मोठे गटार समजेल. थोर निसर्गतज्ज्ञ मारुती चित्तमपल्ली सांगतात की, नदी-ओढे, दगड, माती, वाळू, झाड, पर्वत, डोंगर या प्रत्येकाला देव मानले पाहिजे आणि त्याची पूजा केली तरच आपण हे सगळे स्थानिक जैववैविध्य वाचवू, नाहीतर विनाश अटळ आहे. आपल्या अवतीभवती असणारी फुलपाखरं, मधमाश्‍या, पक्षी, वन्यजीव याचे संरक्षण केले पाहिजे, शिकार थांबविली पाहिजे. अहो हीच तर आहे स्थानिक जैवविविधता, जिचे संरक्षण करणे नितांत गरजेचे आहे. 
batmaheshbat@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT