Natya Sammelan Sangli 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Natya Sammelan : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत 75 सिनेनाट्यगृहे उभारणार; मंत्री सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा

प्रत्येक तालुकास्तरावर नाट्यगृह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

सकाळ डिजिटल टीम

'दर्दी रसिकांची गर्दी आहे, तोपर्यंत नाटकाला ‘अच्छे दिन’ राहणारच. नाट्य संस्कृती रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाट्यसंमेलनात सांगोपांग चर्चा व्हावी.'

सांगली : प्रत्येक तालुकास्तरावर नाट्यगृह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला मिळालेला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील ३६ जिल्ह्यांत ७५ ठिकाणी सिने-नाट्यगृहे उभारण्याचा संकल्प आहे. दर्दी रसिकांची गर्दी आहे, तोपर्यंत नाटकाला ‘अच्छे दिन’ राहणारच. नाट्य संस्कृती रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाट्यसंमेलनात सांगोपांग चर्चा व्हावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली.

१०० व्या नाट्यसंमेलनाचे (Natya Sammelan) नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची (Akhil Bharatiya Natya Parishad) मुहूर्तमेढ नाट्यपंढरी येथील विष्णुदास भावे नाट्यविद्यामंदिरात रोवण्यात आली. या सोहळ्यात ते बोलत होते.

घटकांच्या मिलाफातून नाटक रंगते; पण आव्हानांची चर्चा करावी लागेल. नाटक पाहायला येणाऱ्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये, अशी व्यवस्था उभारू. शिवराज्याभिषेकाचे त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (३५०) वर्ष आहे. त्यानिमित्त ३६ जिल्ह्यांत ‘जाणता राजा’चे प्रयोग करण्यासंबंधी दोनच दिवसांपूर्वी अधिसूचना जारी केली आहे.’’

नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले, ‘‘४० वर्षांत अनेक नाट्यगृहांची दुरवस्था पाहिली. नाट्य परिषदेचा प्रमुख म्हणून सर्वांना एकत्र घेत नाट्यगृहे अधिकाधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांस्कृतिक संचालनालयाची यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करीत आहे. प्रायोगिक असो वा व्यावसायिक नाटक ‘नाट्य’ हवंच. नवोदितांना मुंबईत राहण्यासाठी जागेचा भेडसावणारा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी प्रयत्न करू. नाट्यगृहांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवून निर्मात्यांची वाढत्या वीजबिलांची अडचण सोडवता येईल.’’

पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, ‘‘जिल्‍हा नियोजन समितीतून १० लाखांचा निधी नाट्यसंमेलनास देऊ. नाट्यगृहे वातानुकूलित करण्यासाठी खासगी कंपन्यांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहू.’’ नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी म्हणाले, ‘‘कलाकार मागत असताना राजकारण्यांनी देण्याची भूमिका घ्यावी.’’ प्रारंभी नटराजपूजन व दीपप्रज्वलन, आद्य नाटककार विष्णुदास भावे यांना अभिवादन करून संहितापूजन झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रास्तविकात सांगलीत मुहूर्तमेढ पूजन होत असल्याबद्दल अभिमान आहे. नवे नाट्यगृह दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

नाट्यपरिषदेचे सदस्य मुकुंद पटवर्धन यांनी स्वागत केले. अभिषेक काळे, सुकृत ताह्मणकर, आर्या खाडिलकर, गायत्री कुलकर्णी, धनश्री गाडगीळ यांनी नांदी व स्वागतगीत सादर केले. श्रेयस कुलकर्णी, विवेक पोतदार, धनंजय गाडगीळ यांनी साथसंगत केली. खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नीता केळकर, राजाराम गरुड, सिद्धार्थ गाडगीळ, आदित्य पटवर्धन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शशांक लिमये यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT