नवलमल फिरोदिया  sakal
महाराष्ट्र बातम्या

आज रिक्षा बंद आंदोलन गाजणाऱ्या पुण्यातच एकेकाळी झालाय रिक्षाचा जन्म

कोणत्याही गावाच्या किंवा शहराच्या विकासात, जडणघडणीत काही द्रष्ट्या व्यक्तींची महत्त्वपूर्ण भूमिका असते

राहुल शेळके

अवैध बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षा संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजपासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण चालू आहे. तसेच रिक्षा बंदमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीच्या ॲपमधून बाईक टॅक्सीचा पर्याय काढून टाकण्यात यावा या मागणीसाठी रिक्षा संघटना उपोषण करत आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने जास्तीच्या बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात रिक्षा संघटनांचे आंदोलन चालू आहे त्याला मोठ्या प्रमाणवर प्रतिसाद मिळत आहे मात्र ही रिक्षा कोणी तयार केली या बद्दल कोणालाच माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला रिक्षा तयार करणाऱ्या एका महत्वाच्या व्यक्ती विषयी सांगणार आहोत. कोणत्याही गावाच्या किंवा  शहराच्या विकासात, जडणघडणीत काही द्रष्ट्या व्यक्तींची महत्त्वपूर्ण भूमिका असते. देशाच्या विकास आणि वाटचालीत फिरोदिया परिवाराची कार्यमुद्रा उमटली आहे. 

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

असहकार आंदोलन, पदवी त्याग आंदोलन, न्यायालय आणि सरकारी शाळेवर बहिष्कार , खादी प्रचार कार्य, हिंदू - मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, नशाबंदी यात काम करणारी एक फळी कुंदनमल तथा भाऊसाहेब फिरोदिया यांनी घडविली. त्यांची मुले नवलमल, हस्तीमल आणि मोतीलाल यांनीही त्यांचा वारसा वृद्धिंगत केला. अहमदनगरच्या नवलमल फिरोदिया यांनी बॉम्बे विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेत हाताने सायकल रिक्षा ओढणाऱ्या माणसांच्या प्रश्नांबद्दल ऐकले आणि तिथून त्यांना कल्पना सुचली.

मोटरवर चालणारी रिक्षा असावी असा विचार त्यांच्या मनात सुरु झाला. त्यांना वाचनाची आवड असल्यामुळे विदेशी मॅगझीन चाळत असताना त्यांना माल वाहतूक करणाऱ्या तीन चाकी गाडीचा फोटो दिसला. त्यांनी इंजिनियर असलेल्या आपल्या छोट्या भावाला हस्तीमल फिरोदियाला घेऊन त्याच प्रकारचे मॉडेल भारतात बनवण्याचा विचार केला आणि तशाच प्रकारचे मॉडेल त्यांनी भारतात बनवलं. त्यांनी बनवलेलं हे मॉडेल प्याजीओ कंपनीच्या एप गाडीच्या चेसीवर बॉडी बसवून हे मॉडेल बनवले होते.

फिरोदियांनी बनवलेल्या मॉडेल मध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यांनी त्या मॉडेलमध्ये बदल केले. १९४८ च्या मुंबई काँग्रेस अधिवेशनात त्यांनी बनवलेलं मॉडेल पंतप्रधान नेहरुंना दाखवण्यात आलं. त्यांनी या रिक्षाच प्रोडक्शन करण्याचा विचार केला. त्यांच्या या कृतीला भारत सरकार कडून १९५९ साली सहमती मिळाली आणि पुण्यामध्ये या रिक्षाचं प्रोडक्शन सुरु झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT