मुंबई : सांताक्रूज पोलिस ठाण्यातून राणा दाम्पत्याची आज रविवारी (ता.२४) रवानगी तुरुंगात केली जात आहे. आमदार रवी राणा यांची आर्थर रोड, खासदार नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगात पाठवले जाणार आहे. भायखळा हे महिला कारागृह आहे. जामीन मिळेपर्यंत राणा दाम्पत्याला तुरुंगात राहावे लागेल. तत्पूर्वी रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली. (Navneet Rana And Ravi Rana Sends Jail)
सामाजिक तेढ निर्माण करणार विधान केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आले. त्यानंतर आज रविवारी (ता.२४) वांद्रे न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे. मात्र जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा व रवी राणा यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
दरम्यान राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे न्यायालयाच्या सुनावणी नंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.