Navneet Rana Esakal
महाराष्ट्र बातम्या

Navneet Rana: "जनतेने मला का थांबवले अजूनही कळाले नाही," लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया

Amravati Lok Sabha: यावेळी नवनीत राणा यांना विचारण्यात आले की, तुम्हाला जनतने, कार्यकर्त्यांनी की महायुतीने थांबवले? मात्र, या प्रश्नाला त्यांना सावध उत्तर देत बगल दिली.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपसह महायुतीची दाणादाण उडवली.

यामध्ये महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या तर महायुतीच्या वाट्याला अवघ्या 17 जागा आल्या. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपची 9 जागांवर घसरण झाली.

या निवडणुकीत गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर नवनीत राण यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीहून नागपूर विमानतळावर परतलेल्या अमरावतीच्या माजी खासदार आपल्या पराभवावर बोलताना म्हणाल्या, "मी हरूनही जिंकली आहे. कारण आपलले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे."

पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "मी माझ्या मतदारसंघात भरपूर कामे केली आहेत. गेल्या वेळी लोकांनी मला अपक्ष म्हणून निवडून दिले. पण अजूनही कळाले नाही की माझ्या जनतेने यावेळी मला का थांबवले."

यावेळी नवनीत राणा यांना विचारण्यात आले की, तुम्हाला जनतने, कार्यकर्त्यांनी की महायुतीने थांबवले? मात्र, या प्रश्नाला त्यांना सावध उत्तर देत बगल दिली.

यंदाच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघा महायुतीमध्ये भाजपकडे आला होता. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली होती.

यमाध्ये राणांसमोर काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांच्या आव्हान होते. तर काँग्रेसचेच बंडखोर दिनेश बूब यांनी आमदार रवी राणा यांच्ये कट्टर विरोधक बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून निवडणूक लढवली होती.

मात्र, अत्यंत्य चूरशीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांनी बाजी मारली. यामध्ये वानखेडे यांना 5,26,271 मते मिळाली. तर, राणा यांना 5,06,540  मते मिळाली.

लोकसभेच्या बाबतीत महाराष्ट्राचा विचार केल्यास जनतेने भाजपसह एनडीएला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळाले. या निवडणुकीत राज्यात काँग्रेसने सर्वाधिक 13, शिवसेना उद्धव ठाकरे यांनी 9 राष्ट्रवादी शरद पवार यांनी 8, भाजप 7, शिवसेना एकनाथ शिंदे यांनी 7, राष्ट्रवादी अजित पवार यांनी व अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी 1 जागा जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT