Navneet Ranas tola when Thackeray government is in trouble Navneet Ranas tola when Thackeray government is in trouble
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे सरकार अडचणीत असताना नवनीत राणांचा टोला; म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राला संकटातून वाचवता यावे यासाठी ११ वेळा हनुमान चालिसाचे पठण केले आहे. फक्त संकटमोचककडून आशा आहे की ते या संकटातून राज्याला वाचवेल, असे टीकास्त्र संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) सरकारवर खासदार नवनीत राणा यांनी सोडले. महाविकासआघाडीचे सरकार आपल्याच कृत्याने पडणार असल्याचेही नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या. (Navneet Ranas tola when Thackeray government is in trouble)

राज्यसभा आणि विधान परिषदेत अशा प्रकारे मतदान झाल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेचे आमदार खूश नाहीत. त्यांनीच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करून विजयी केले. अडीच वर्षे महाराष्ट्र बुडताना पाहत आहोत. महाराष्ट्रावरचे संकट लवकर संपले पाहिजे. राज्याचे नुकसान होताना आमदार पाहू शकत नाही. हे संकट लवकर दूर झाले पाहिजे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांमुळे हे संकट निर्माण झाले आहे. हे सरकार उद्धव ठाकरे यांच्याच कृतीमुळे पडणार आहे, असेही नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केल्याने राणा दाम्पत्य वादात सापडले होते. नवनीत राणा यांना पती रवी राणांसह तुरुंगात जावे लागले होते. रवी राणा हेही आमदार असून, नवे सरकार स्थापन झाल्यास त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या सरकारचा जनतेशी संपर्क तुटला आहे, असेही नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

शिंदे यांच्या संतापाचा शिवसेनेला फटका

महाराष्ट्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात बंडखोरी केली आहे. तीन मंत्री आणि जवळपास २६ आमदारांसह ते सुरतमधील हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेनेतल्या (shiv sena) बाचाबाचीमुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा शिवसेनेला मोठा फटका बसला असून, उद्धव ठाकरेंनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT