narayan rane esakal
महाराष्ट्र बातम्या

मलिकांनंतर कुणाचा नंबर हे लवकरच कळेल; नारायण राणेंचे सूचक वक्तव्य

सुडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार- नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदर्ग) : माझ्या मुंबईच्या (Mumbai) घरावर कारवाई असेल किंवा अन्य त्रास देण्याचे प्रकार हे सगळं सुडाचं राजकारण आहे. त्‍यांनी लक्षात ठेवावं की सुरवात त्‍यांनी केलीय. पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज येथे दिला. नवाब मलिकांनंतर (Nawab Malik) कुणाचा नंबर हे देखील लवकरच कळेल असे ते म्‍हणाले. ओसरगाव येथील महिला भवन मध्ये राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्‍हणाले, " राज्‍यातील महाविकास आघाडी सरकार दहा वर्षापूर्वीची प्रकरणं उकरून काढून मला त्रास देण्याचा प्रयत्‍न करत आहे. परंतु मी योग्‍य त्‍या परवानग्‍या मिळवूनच मालवण आणि मुंबईतील घर बांधलं आहे. मुंबईतील घरामध्ये खिडकीची काच छोटी असावी की मोठी असावी असे किरकोळ आक्षेप मुंबई महानगर पालिकेने घेतले आहेत. त्‍याबाबतचा खुलासाही आम्‍ही लवकरच मुंबई महानगरपालिकेला करणार आहोत.

मालवण येथील घराबाबतही मला कुठलीही नोटीस आलेली नाही. पण काही माध्यमे चुकीची माहिती देऊन माझी बदनामी करत आहेत. माझी बदनामी करणं हीच ते पत्रकारिता समजत आहेत. परंतु माझी बदनामी केलेल्‍या सर्वच माध्यमांविरोधात मी दोन तीन दिवसांत न्यायालयात जाणार आहे. माझ्या बंगल्‍यावर कारवाई नोटीस आली की त्‍याची पुरवणी काढा, मला कोणताही आक्षेप नाही, पण कसलीही नोटिस नसताना झालेली बदनामी मी खपून घेणार नाही."

माझी बदनामी करणं हीच ते पत्रकारिता समजत आहेत. परंतु माझी बदनामी केलेल्‍या सर्वच माध्यमांविरोधात मी दोन तीन दिवसांत न्यायालयात जाणार आहे.

राऊतांची मनस्थिती ठीक नाही

ईडी केवळ भाजप विरोधकांवर कारवाई करते असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रश्‍नावर बोलताना राऊत (Sanjay Raut) यांची मनस्थिती ठीक नसल्‍याचे उत्तर राणे यांनी दिले. तसेच भाजपच्या मंत्र्यांविरोधात तक्रार द्यायला त्यांना कुणीही रोखलेलं नाही. त्‍यांनी जरूर इडीकडे जाऊन तक्रारी कराव्यात. सध्या राऊतांची मनस्थिती ठीक नसल्‍याने त्‍यांच्या आरोपाविषयी फारसं काही बोलणार नसल्‍याचे राणे म्‍हणाले.

दिशा सालीयाला न्याय मिळण्याचा प्रयत्‍न

दिशा सालीया (Disha Salian) हिची बदनामी आम्‍ही केलेली नाही. तिला ज्‍या प्रकारे मारण्यात आलं. तिची केस दाबली जाऊ नये यासाठीच आम्‍ही दिशाच्या मृत्‍यूबाबत आवाज उठवत आहोत. तर दिशाच्या आईवडीलांना कोण प्रवृत्त करतंय याचीही माहिती आमच्याकडे आहे असेही राणे म्‍हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT