Supriya Sule On PM Modi e sakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik Case l ईडी-भाजपच साटलोट; सुप्रिया सुळेंचा घणाघात

भाजपने अतिरेक केला - सुप्रिया सुळे

सकाळ डिजिटल टीम

नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी टोकाची भूमिका कोणीही घेतली नव्हती. पंधरा दिवसांनी अटक होईल असे भाजपतील काही मंत्री, प्रवक्ते सातत्याने ट्विट करत होते. हे अर्थात खरे झाले आहे. ईडी (ED) आणि भाजप (BJP) एकत्र काम करतात असा आरोप सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे.

आम्ही ताकतीने आम्ही यामध्ये लढणार आहे. भाजपचा हा भिती दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत महाराष्ट्र कधी दिल्लीच्या समोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. आम्ही सर्वजन नवाब मलिक यांच्या सोबत आहोत असे ही त्या म्हणाल्या.

आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत महाराष्ट्र कधी दिल्लीच्या समोर झुकला नाही आणि झुकणारही नाही.

भाजपने अतिरेक केला आहे. जेव्हा एकादा पेपर फुटतो तेव्हा लगेच कारवाई करता.मात्र ईडीचा पेपर जेव्हा फुटतो तेव्हा मात्र कारवाई का केली जात नाही असा प्रश्न मी अमित शहा यांना विचारणार आहे. याबाबत अमित शहा यांनी न्याय द्यावा अन्यथा पारदर्शी सरकार नाही हे मान्य करावं असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.

चंद्रकांत पाटील यांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा असे सांगितले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडीवर राजकिय दबाव आहे. मात्र आमचा न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही झुकणार नाही लढत राहणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT