सध्या देशात पाच राज्यांतील निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅग्रेसवर हल्लाबोल केला आहे. लोकसभेत कोरोनावरून काॅग्रेसला धारेवर धरले तर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत घराणेशाहीचा (Dynastic) लोकशाहीला (Democracy) सर्वांत मोठा धोका (Danger)आहे. घराणेशाहीमुळे युवक राजकारणात (Politics) येण्यापासून रोखले जात आहेत. सार्वजनिक जीवनात येण्यास युवक घाबरत आहेत,’ अशी तीव्र टीका केली. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी युपीमध्ये एकाच कुटुंबातील ५६ तर गोव्यात दोन जोडप्यांना भाजपाकडून तिकीट का दिले असा सवाल उपस्थित केला आहे. पंतप्रधन मोदी (Narendra Modi) जे अर्ध वक्तव्य करतात ते त्यांच्या पदाला शोभत नाही. मोदी हे आता कार्टून्सनिस्ट झाले आहेत अशी खिल्ली मलिक यांनी उडवली.
दरम्यान मलिकांनी मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाले, सर्वकाही मीच करू शकतो असे सांगून मोदी यांनी सत्ता मिळवली. कालपर्यंत ते टीका करत होते आता त्यांच्यावर टीका होत आहे. ते आता जनतेचे कार्टूनिस्ट झाले आहेत. ते इतके खोटे बोलतात की, परवा म्हणाले काँग्रेसने हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरून काढले. मुळात हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीत कधीच नोकरीत नव्हते यावरूनच लक्षात येते की ते किती खोटे बोलत आहेत.
गोवा निवडणूकी संदर्भात ते म्हणाले, गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Savant ) निवडणूक हरू शकतात अशी स्थिती आहे. प्रमोद सावंत हे आधी वॅगनार कार (wagnor) मध्ये फिरत होते आता त्यांना मतदारसंघात नाव बदलून प्रॉपर्टी सावंत अस केले आहे. यावेळी भाजप विरोधात नाराजी व्यक्त कतर पटोले म्हणाले, काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे विधान नाना पटोले यांनी केले आहे.
मोंदीच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, भाजप इतिहास खोटा सांगतात.गोव्यातील लोकांना वेगळं राज्य हवेआहे. भाजपला हुकूमशाही अपेक्षित असते पण आम्ही असे होऊ देणार नाही. प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना मलिक म्हणाले, मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी आहे. मी त्यांच्या सारखं भविष्य सांगू शकत नाही पण, मी जितकं फिरलो त्यानुसार आम्हाला बहुमत मिळणार असे दिसतेय असा दावा मलिक यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.