क्रूझ ड्रग प्रकरणावर एनसीबीने केलेल्या केलेल्या कारवाईनंतर सुरुवातील आर्यन खान आणि अटक झालेल्या लोकांची नावं चर्चेत होती. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी एक ट्विट करून या कथेमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण केला आहे.
नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिक सुरू केली आहे. आज नवाब मलिक यांनी पुन्हा एक नवीन फोटो ट्विट करत सर्वांसमोर प्रश्न निर्माण केला आहे. नवाब मलिक यांनी जीममध्ये व्यायाम करणाऱ्या एका व्यक्तीचा सेल्फी ट्विट करत हा कोण आहे? असा प्रश्न समीर वानखेडे आणि त्यांच्या वडीलांना विचारला.
नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग प्रकरणात केलेल्या संपूर्ण कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही लोकांना ठरवून टार्गेट करण्यात आलं होतं, तसेच या कारवाईतील पंच आणि समीर वानखेडेंच्या संदर्भातील लोकांवर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मलिक यांनी शेअर केलेल्या या नव्या फोटोचा आणि समीर वानखेडेंचा काही संबंध आहे का हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे. समीर वानखेडे यावर काय प्रतिक्रीया देतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.