Shinde-Fadnavis-Ajit Pawar Government esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या आमदारांना शिवसेना-भाजपपेक्षा दुप्पट निधी, तर काँग्रेसला…

रोहित कणसे

राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी अर्थ खात्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर आमदारांना निधी मंजूर केला आहे. या नंतर निधीवाटपावरून राजकीय वर्तुळात राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवशेनात देखील पाहायला मिळाले.

यादरम्यान विशेष म्हणजे निधीवाटपादरम्यान अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी तब्बल ५८० कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर मतदारसंघातील विकासकामांसाठी भाजपचे विधानसभेचे आमदार प्रशांत बंब यांना सर्वाधिक ७४२ कोटी इतका सर्वधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान मतदारसंघातील विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या या निधीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही म्हणजेच अजित पवार आणि शरद पवारांचा गट यांना मंजूर करण्यात आलेला निधी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे आमदार यांना एकत्रित देण्यात आलेल्या निधीच्या जवळपास दुप्पट आहे. साम टीव्हीने यासंबंधीची आकडेवारी दिली आहे.

कोणाला आमदाराला किती निधी?

राष्ट्रवादी (शरद पवार गट)

  1. जयंत पाटील, वाळवा - ५८० कोटी

  2. राजेश टोपे, घनसावंगी - २९३ कोटी

  3. रोहित पवार, कर्जत-जामखेड - २१० कोटी

  4. संदीप क्षीरसागर, बीड - ३५ कोटी

राष्ट्रवादी (अजित पवार गट)

  1. दत्ता भरणे, इंदापूर - ४३६ कोटी

  2. मकरंद पाटील, वाई-खंडाळा-महाबळेश्वर - २९१ कोटी

  3. किरण लहामटे, अकोले ११६ कोटी

  4. दिलीप वळसे-पाटील, आंबेगाव - ९६ कोटी

  5. अजित पवार, बारामती - ७३ कोटी

  6. अदिती तटकरे, श्रीवर्धन - ४० कोटी

  7. माणिकराव कोकाटे, सिन्नर - ३३ कोटी

  8. छगन भुजबळ, येवला - ३१ कोटी

  9. हसन मुश्रीफ, कागल - २२ कोटी

  10. धनंजय मुंडे, परळी - २१ कोटी

  11. प्रकाश साळुंखे, माजलगाव - १३ कोटी

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  1. अब्दुल सत्तार, सिल्लोड - ५८ कोटी

  2. भरत गोगावले, महाड - १३४ कोटी

  3. महेंद्र दळवी, अलिबाग - ४५ कोटी

  4. महेंद्र थोरवे, कर्जत - ४८ कोटी

  5. संदीपान भुमरे, पैठण - २९ कोटी

  6. संतोष बांगर, कळमनुरी - १९ कोटी

भाजप

  1. प्रशांत बंब, गंगापूर - ७४२ कोटी

  2. महेश बालदी, उरण - २८ कोटी

माकप

  1. विनोद निकोले, डहाणू - ७६ कोटी

काँग्रेसच्या १५ आमदारांना एकही रुपाया नाही..

राज्यातील आमदारांच्या निधीवाटपात अजित पवार गटाच्या तसेच शरद पवार गटात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भरघोस निधी मिळाला आहे. मात्र या निधी वाटपात काँग्रेसच्या १५ आमदारांना एक रुपयाही निधी देण्यात आलेला नाही, तर इतर २० आमदारांना केवळ १ ते ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांच्या तोंडालाही निधी वाटपात पाने पुसण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT