NCP Ajit Pawar group contest 13 to 14 Lok Sabha seats PN Narendra Modi CM Shinde Fadnavis govt 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : अजित पवारांचे PM मोदींच्या नेतृत्वात 'मिशन लोकसभा'! 'इतक्या' जागांवर दावा

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र या दरम्यान अजित पवारांनी केलेल्या या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत.

शिंदे फडणवीस सरकारला अजित पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर आगामी निवडणूकांसाठी जागावाटपावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गाटातील नेत्यांना संधी न मिळाल्याने नाराजी असल्याच्या चर्चा आहेत.

यासोबतच मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले भाजप आमदार देखील देखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत.यादरम्यान अजित पवार गट लोकसभेला १३-१५ जागा लढवणार असून विधानसभेच्या ९०जागांवर देखील त्यांच्याकडून दावा सांगण्यात आला आहे.

'इतक्या' जागा लढवणार

देशातील सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा २०२४ निवडणुकांसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा आगामी लोकसभा निवडणुकीत १३-१५ जागा लढवणार आहे.

तसेच विधानसभेला ९० जागा लढवणार असल्याचे देखील अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि आता अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट यांच्यात जागा वाटपावरून दंगल पेटण्याची शक्यता आहे.

अजित पवारांना लोकसभेसाठी १३-१५ जागांवर लढण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर लोकसभेत दोन आकडी जागा जिंकण्याचा निर्धार अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान या सर्व राजकीय पार्श्वभूमिवर शरद पवार गटाचा विरोधाला अजित पवारांना सामोरे जावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT