अजित पवारांनी बंड केल्यानं राज्यात राजकीय भुकंप झाला असून, अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या राजकीय घडामोडीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सिंहासन चित्रपटातील दिगू टिपणीस या पात्राची आठवण करून दिली आहे. ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले..
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
'या' आमदारांनी घेतली मंत्रिमंडळाची शपथ
उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे या मातब्बर नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान शरद पवारांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केली नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.