राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आज (२१ एप्रील) सकाळ माध्यमास दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीदरम्यान पवारांनी पहाटेच्या शपतविधीनंतर देखील उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडेच कशी देण्यात आली यावर भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पार पडलेल्या पहाटेच्या त्या शपथविधीनंतर तुमच्याच पक्षामधून तुमच्या बद्दल नकारात्मकता दिसून येत होती. तरीसुध्दा उपमुख्यमंत्री म्हणून तुमचं नाव पुढे आलं आणि पुढे तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व देखील केलं. याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, पहाटे नाही, सकाळी आठला पहाट म्हणत नाहीत. पहाट म्हणजे चार, पाच, सहा इथपर्यंत..सात-आठला पहाट म्हणाल का? आठ वाजता सकाळ झालेली असते.
पुढे प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मी या घटनेकडे जशी घडली तसं बघतो. मी वेगळ्या पध्दतीने याकडे पाहात नाही. या गोष्टीला जवळपास साडेतीन वर्ष झाली आहेत. मी सुरूवातीपासून सांगतोय यावर मला कुठलंच वक्तव्य करायचं नाही. मला ते पद का मिळालं तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ५४ आमदार निवडून आले होते त्यापैकी बहुसंख्य आमदारांनी सांगितलं की तुम्ही अजितलाच उपमुख्यमंत्रीपद द्या. त्यामुळेच पक्षाने आणि वरिष्ठानी ते मला दिलं असं अजित पवार म्हणाले.
भाजपमध्ये जाण्याबाबत राष्ट्रवादीत दबावगट आहे का?
राष्ट्रवादीमध्ये असा कुठला कायम दबावगट आहे का ज्याचं भाजपसोबत गेलो तर आपण स्थिर सरकार देऊ शकतो असं म्हणणं आहे? या प्रश्नावर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट केलं की, असा कुठलाही दबावगट राष्ट्रवादीमध्ये नाहीये, याबद्दल गैरसमज करण्याची गरज नाही.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, शेवटी काम करत असताना आपण सेक्युलर, पुरोगामी महाराष्ट्र अशा गोष्टी बोलत आलो, पण २०१९ ला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार स्थापन झालं तेव्हा या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यात आला. कारण शिवसेनेने नेहमी हिंदूत्वाचा पुरस्कार केला आहे, पण नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाकरिता मतभेत होतील अशी मते पुढे आणायची नाहीत असं ठरवून काम केलं गेलं.
परंतू शेवटची कॅबिनेट झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं की औरंगाबादला संभाजीनंगर आणि उस्मानाबादला धाराशीव नाव द्यायचं आहे. तेव्हा सर्व पक्षांची वेगवेगळी भूमिका होती. सगळ्यांनी समंजसपणा दाखवला आणि ठराव मान्य करण्यात आला. त्यानंतर सरकार गडगडलं असं अजित पवार यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.