NCP (ajit pawar) sakal
महाराष्ट्र बातम्या

NCP (Ajit Pawar) अजित पवारांना लेखी उत्तर द्यावे लागणार;सर्वोच्च न्यायालयाकडून पक्षाला दोन आठवड्यांची मुदत

‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष’ आणि या पक्षाच्या ‘घड्याळ’ चिन्हावरील ताब्यावरून सुरू झालेल्या संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दोन आठवड्यांत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

‘राष्ट्रवादी’ची सुनावणी

नवी दिल्ली : ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष’ आणि या पक्षाच्या ‘घड्याळ’ चिन्हावरील ताब्यावरून सुरू झालेल्या संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दोन आठवड्यांत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या उत्तरावर काही म्हणणे मांडायचे असेल तर ते एका आठवड्यात मांडावे, असे निर्देश शरद पवार गटाला देत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ६ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस’वरील ताब्याचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर अजित पवार गटाचा ताबा राहील, असा निर्वाळा दिला होता. या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. शरद पवार गटाला सध्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार’ या नावाने ओळखले जाते.

‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे या पक्षाचे चिन्ह आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने १० जागा लढविताना ८ जागा जिंकल्या होत्या. महायुतीत सामील असलेल्या अजित पवार गटाला अवघी एक जागा जिंकता आली होती. निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षा’ला आणि ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हाला अधिकृत मान्यता दिली होती. यामुळे या पक्षाला निधी गोळा करण्याची मुभा मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT