NCP Ajit Pawar Speak about praful patel Sharad Pawar Photo marathi political news  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : "माझं ते काम नाही..."; शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या त्या फोटोवर अजित पवार स्पष्टच बोलले

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. यादमरम्यान अजित पवार गटात गेलेले नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबत फोटो शेअर केला होता. यावरून अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता मला त्याबद्दल काही बोलायचं नाही असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

अजित पवार म्हणाले की, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. याचा फोटो त्याचा फोटो ते माझं काम नाही. तु्म्ही विकासाबद्दल मला विचारा. विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे आणि आमचं काम सुरू आहे. मी सातत्याने महाराष्ट्रात फिरताना प्रश्न सोडवण्यासाठी मी बैठका आणि आढावा घेतोय त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे असे अजित पवार म्हणाले.

सतत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याबद्दल अजित पवार यांना विचारण्यात आले असता, मी असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही असं रोखठोक उत्तर अजित पवारांनी दिलं.

नेमकं झालं काय होतं?

नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्रित खास पोझमध्ये फोटो काढला होता. इतकेच नाही तर हा फोटो प्रफुल्ल पेटल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर देखील केला.

प्रफुल्ल पटेल यांनी फोटो शेअर करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. "नवीन संसद भवनातील आजचा ऊर्जेप्रमाणं उत्साहित दिवस. राज्यसभा चेंबर खूपच आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्यानं आणखीनच खास बनला आहे. त्याचबरोबर कॅफेटेरियात मित्रांसह स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेत आहोत. खरोखरच आजचा दिवस लक्षात ठेवण्यासारखा आहे" असे पटेल म्हणाले होते. दरम्यान या फोटोनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT