मुंबई : आंध्रप्रदेशमधील तिरूपती तिरूमला बालाजी मंदिरात गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असणाऱ्या गाड्यांची कर्मचाऱ्यांकडून अडवणूक करण्यात येत असल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर या प्रकाराबद्दल अनेकांकडून निषेध केला जात आहे, यादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. (ncp ajit pawar on Chhatrapati shivaji maharaj tirupati balaji temple entry clarence row viral video)
गाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असणाऱ्या वाहनांना मंदीरात प्रवेश नाकारला, या प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, या तिरूपती तिरूमला बालाजी मंदिराचे ट्रस्टी असलेल्या मिलींद नार्वेकरांशी या प्रकरणात पर्क साधला असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितल. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कारण नसताना जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. उभ्या महाराष्ट्राचं शिवाजी महाराज हे दैवत आहेत, त्यांच्याबद्दल अशा पद्धतीच्या बातम्या पसरणं, चर्चा होणं किंवा सोशल मीडियात बातम्या येणं चुकीचं आहे., त्यांना ताबडतोब म्हणणं मांडण्यास सांगितलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाविकांच्या भावना भडकवल्या जात आहेत, लोकांना काय झालं माहिती नाही. अनेक लोक फोन करून नक्की काय झालं असं विचारत आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांना त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून असं काही तिथं घडलं आहे का? त्याबद्दल त्या सरकारची भूमिका काय आहे, याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधून सुरू झालेली चर्चेला पायबंद बसेल त्याबद्दल काम करावं, या प्रकरणातील वस्तूस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावी असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यावेळी म्हाणाले.
प्रकरण काय आहे?
काल तिरूपती देवस्थानच्या चेक पोस्टवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका व्यक्तीने मंदीर प्रशासनावर आरोप करत गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्यामुळे आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला आहे. गाडीतील शिवाजी महाराजांची मुर्ती काढून टाका अन्यथा पुढे जाऊ दिले जाणार नाही असं कर्मचारी म्हणत असल्याचा दावा सदर व्यक्तीने केला होता.या घटनेनंतर अनेकांकडून मंदिरावर आक्षेप घेतले जात असून देवस्थानाविरोधात रोष व्यक्त केला जात होता. तुम्ही शिवाजी महाराजांच्या मुर्त्यांवर बंदी घातली तर आम्ही महाराष्ट्रीतल लोकं तिथे येणार नाहीत अशा शब्दांत रोष व्यक्त केला जात आहे.
या प्रकारानंतर यासंबंधी देवस्थानाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गाडीमध्ये मूर्ती, फोटो, राजकीय निशाणी असलेल्या वाहनांवर एका दशकांपूर्वी बंदी घातल्याचं स्पष्टीकरण देवस्थानने दिलं आहे. अडवलेल्या गाडीतील मूर्ती शिवाजी महाराजांची असल्याचं समजताच, त्या गाडीतील भाविकांना प्रवेश देण्यात आला आहे. पण असून सदर भाविकाने केलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण बालाजी देवस्थानने दिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.