मुंबई- ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कधीही प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात बोललो नाही, असं ते म्हणाले आहेत.
मी कधीच त्यांच्या विरोधात बोललो नाही. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. या अडचणीच्या काळात आम्हाला तुमची मदत हवी आहे. मंडळ आयोगाच्या कामात तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, आज अडचणीत असताना आम्हाला मगत करावी, मला खात्री आहे की येत्या काळात ते आम्हाला मदत करती, असं भुजबळ म्हणाले होते.
प्रकाश आंबेडकरांनी एक संदेश दिला होता की मराठ्यांचं ताट आणि ओबीसींचं ताट वेगळं करा. याचा अर्थ आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं घेतलं आहे, असं भुजबळ म्हणाले. ओबींसीचा मेळावा आज हिंगोली येथे पार पडणार आहे. सभेला जाण्याआधी भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना वरील प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
आरक्षणावरुन सध्या वाद सुरु झाला आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. मंडळ आणि कमंडलमध्ये तुम्ही कमंडलसोबत होता हा इतिहास आहे. यामध्ये शेंडगे असो की भुजबळ असो. जनता दलासोबत आरक्षण मिळवून देणारे आम्हीच आहोत. आता आरक्षण वाचवता येत नाही म्हणून भिडवण्याचं काम सुरु आहे, असं आंबेडकर म्हणाले होते.
प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला. कानात बोलणाऱ्यांचं ऐकू नका, दुसऱ्यांचा सल्ला घेऊ नका, असं ते म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, मी आंबेडकरांचा सल्ला ऐकतो. पण, माझा कोणीही सल्लागार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.