NCP chief sharad pawar write to State Legislative Assemblies
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती यांना पत्र लिहिले असून ९ आमदार आणि २ खासदार यांच्या अपात्रेतेच्या कारवाईची मागणी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरुन जो संभ्रम निर्माण झालाय, तो दूर होण्यास मदत होणार आहे.
परिषिष्ठ १० मध्ये जी तरतूद आहे त्यानुसार ९ आमदार आणि २ खासदार यांनी पक्षाच्या घटनेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे या आमदार आणि खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आल्याचं समजतंय.
राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर पक्षाकडून अजित पवार आणि इतर नेत्यांना नोटिस पाठवली होती. त्याला आणखीन उत्तर मिळाले नाही. उत्तर मिळण्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा सभापती यांना आमदार आणि खासदार यांच्यावर अपात्र ठरवण्याची कारवाई करावी यासाठी पत्र लिहिण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगासमोर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा अजित पवार गटाने पक्षाविरोधात भूमिका घेतली त्यामुळे त्यांना अपात्रता ठरवा अशी मागणी शरद पवार गट करणार असल्याचं सांगण्यात येतंय. अद्याप विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सभापती यांनी या पत्रावर कार्यवाही केलेली नाही अशी सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रीय सुळे यांनी अजित पवार आमचेच नेते असल्याचं म्हटलं होतं. तसेच पक्षात फूट पडली नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. तथापि, शरद पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं असून अजित पवार आमचे नेते नाहीत. तसेच त्यांना पुन्हा संधी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.