NCP Crisis Update : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटूनंतर दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यादरम्यान भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. रोहित पवार सुळे गटाचे पप्पू आहेत, त्यांनी पक्ष संपवण्याची सुपारी घेतल्याची टीका नितेश राणेंनी केली. दरम्यान या टीकेला रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले नेते दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली असा आरोप अ केला होता. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.
नितेश राणे काय म्हणाले?
रोहित पवार हा त्यांच्या पक्षाचा राहुल गांधी आहे. प्रत्येक पक्षामध्ये एख पप्पू असतो. काँग्रेसचा पप्पू राहुल गांधी आहे, उबाठाचा पप्पू आदित्य ठाकरे आहे आणि सुळे गटाचा पप्पू हा रोहित पवार आहे. जसं संजय राऊत उद्धव ठाकरे गटाला संपवत आहेत, तसंच रोहित पवारांनी सुळे गट संपवण्याची सुपारी घेतली आहे. म्हणून रोहित पवारांनी बोलत राहावं त्याचा फायदा अजित पवारांना मोठ्या प्रमाणात होईल, असे नितेश राणे म्हणाले.
रोहित पवारांचं प्रत्युत्तर
रोहित पवारांनी नितेश राणे यांच्या टीकेल्या खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. रोहित पवार म्हणाले की, संजय राऊतच म्हटलेत ना? मला भीती होती मला कोणी नितेश राणे म्हणेल का काय, मला कोणी नितेश राणे म्हटलं नाही याचा अभिमान आहे. राजकीय क्षेत्रात वातावरण खालच्या पातळीवर घेऊन जाण्यात काही प्रणाणाक नितेश भाऊ सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे कोणाबरोबरही माझं नाव जोडा, पण तुमच्यासोबत तरी जोडू नका अशी विनंती मी करतो असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.