NCP Crisis Sharad Pawar news elderly lady video call to Sharad Pawar MP Amol Kolhe goes viral rak94 
महाराष्ट्र बातम्या

Shard Pawar Video : शरद पवारांना आजीबाईंचा फोन; आम्ही तुमच्यासोबतच.., व्हिडीओ आला समोर

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी शरद पवार यांनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांच्या दौऱ्याची आज नाशिकमधील येवला येथे शुभारंभ होत आहे. या दौऱ्यादरम्यान सामान्य कार्यकर्त्यांचा त्यांना भरभरून पाठिंबा देखील मिळताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या हलचालींकडे अख्ख्या महाराष्ट्रचे लक्ष लागले आहे. यादरम्यान शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांचे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एका महिलेसोबत झालेल्या संभाषण शेअर केले आहे.

अमोल कोल्हे यांनी या व्हिडीओ क्लिप सोबत "हा मातामाऊलींचा विश्वास आदरणीय शरद पवार साहेबांवर.. “आता आणखी ठणठणीत झालोय” हे साहेबांचं वाक्य अनेकांना उमेद देणारं आहे! उमेद संघर्षाची, तत्वांसाठी लढण्याची! आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांच्यासोबत पवार साहेबांची ही बातचीत ऊर्जा देणारी आहे." असं कॅप्शन देखील दिलं आहे.

व्हिडीओ मध्ये काय आहे?

हा व्हिडीओ कॉल दरम्यान शरद पवार हे गाडीतून प्रवास करताना दिसत आहेत. ताराबाई निघोट या पवारांना हॅलो पवार आम्ही आहेत तुमच्या पाठिशी, तुम्ही काही घाबरू नका असे सांगताना दिसत आहेत. तर शरद पवार त्यांना सगळं व्यवस्थित आहे काही काळजी करू नका असे सांगताना ऐकू येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT