NCP Crisis 
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: "श्रीनिवास पाटील पितृतुल्य पण राजकीय लढाईत..."; सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगिलतं

Sandip Kapde

NCP Crisis: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी अजित पवार गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत. खासदार सुनील तटकरे, धनंजय मुंडे अन्य नेते उपस्थित राहणार असून यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले.

महिला आरक्षण विधेयकावेळी मी उपस्थित नव्हतो. मतदान केलं नाही, असे सुप्रिया सुळे म्हणतात. हे खरं आहे. पण गणपतीचा पहिला दिवस होता. नरेंद्र मोदी यांचे पूर्ण भाषण ऐकलं. पण गणपतीमुळे मला जावं लागलं. ५४२ लोकसभेचे सदस्य आहेत. मात्र मतदानामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची संख्या ४८० होती. त्यामुळे उरलेले सर्व महिला विरोधी आहेत. असं म्हणणं चुकीचं आहे. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यावर आरोप केले जातात, असा टोला सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

राज्यसभेत, लोकसभेत अजित पवार गटाने पत्र दिले त्या पत्रात शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा उल्लेख नाही. यावर सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्यावरती आम्ही याचिका दाखल केली आहे. शरद पवार यांच्याविरोधात आम्ही कुठलीही  याचिका दाखल केली नाही. साहेब आमचे दैवत आहेत, असे तटकरे म्हणाले.  

काल सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली की श्रीनीवास पाटील यांचं वय ८३ वर्ष आहे. त्यांच्याविरोधात पिटीशन दाखल केली यावर सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेता. याला देखील सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. 

अजितदादांनी गेली ३० वर्ष बारामीती उभं केले. दादा दादा बोलत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. मात्र दादांच्या विरोधात याचिका दाखल करताना त्यांना राजकीय भूमिका भिन्न असल्याचे आठवते. श्रीनिवास पाटील यांच्याबाबत मला कमालीचा आदर आहे. राज्यपाल असताना देखील त्यांनी मला बोलावलं आहे. ते आम्हाला पितृतुल्य आहेत. मात्र राजकीय लढाई जेव्हा होत असते त्यावेळी वयोमर्यादेचा विषय येत नसतो. सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, असे सुनील तटकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT