NCP Political Crisis Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह घड्याळ हे अजित पवारांचे असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला आहे. शरद पवारांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र त्याआधीच अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे. (Ajit Pawar Faction caveat)
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार गटाने मागणी केली आहे की विरोधी पक्षाकडून प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी अजित पवार गटाला देखील मिळावी. सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून दोन गटात वाद सरू आहे. या वादावर सुनावणी घेत निवडणूक आयोगाने अजित पवार गट खरी राष्ट्रवादी असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह देखील अजित पवार यांना देण्यात आलं आहे.
दरम्यान शरद पवार गटाने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीमधील त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी देखील निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. आणि कोर्टात जाणार असल्याचे म्हटले होते.
आता अजित पवार गटाने कॅव्हेट दाखल करत सर्वोच्च न्यायालयात शरद पवारांकडून या प्रकरणात कुठलीही याचिका दाखल झाल्यास त्यावर एकतरफा निर्णय घेतला जाऊ नये असे म्हटले आहे. तसेच या प्रकरणात त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जावं अशी मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोस्टर देखील लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये शरद पवार, सु्प्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे फोटो सह चिन्ह तुम्हारा बाप हमारा असा मजकूर लिहीला आहे.
कॅव्हेट काय असते? (What is a caveat)
कॅव्हेट म्हणजे इशारा’ किंवा ‘सावधानपत्र’. एखाद्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या किंवा दाखल होणाऱ्या दाव्याची पूर्वसूचना देण्यात यावी, त्याशिवाय त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने कोणताही एकतर्फा हुकूम देऊ नये, याकरिता करण्यात आलेला अर्ज म्हणजे कॅव्हेट. ही न्यायालयाला देण्यात आलेली एक कायदेशीर नोटीस असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.