ठाकरे सरकारचा पलटवार, मुश्रीफ सोमय्यांवर गुन्हा दाखल करणार तसेच चंद्रकांत पाटलांवर भ्रष्टाचाराचे पुरावे देणार आहेत.
गेल्या काही दिवासांपासून राज्यातील ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यातील वातारण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकही करण्यात आली होती. याच्याच दुसऱ्या अंकाला आजपासून सुरुवात झाल्याचं दिसत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपायांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते सोमय्यांच्या रडारावरील ठाकरे सरकारमधील बारावे मंत्री ठरले. वारंवार भाजपकडून ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. काही नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिराही लागला आहे. यालाच आता राज्यातील ठाकरे सरकारनेही प्रत्त्युत्तर दिलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार आहे. भाजप सत्तेत असताना चंद्रकातं पाटील यांनी घोटाळे केले आहेत. रस्ते घोटाळ्या प्रकरणी चंद्रकातदादा पाटील यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार आहे. त्याबाबतचे पुरवा देणार आहे. चंद्रकांत पाटील यांच धाडस झालं नाही म्हणून त्यांनी किरीट सोमय्यांच्या खाद्यावर बंदूक ठेवली. किरीट सोमय्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसावं. ते कोल्हापूरला आले असते, तर त्यांना स्पष्टपणे खरी परिस्थिती समजली असती. असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
सोमय्यांनी काय केला आरोप?
हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत २७०० पानांचा पुरावा असल्याचा दावा सोमय्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे केला. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुंबईत ईडीकडे मंगळवारी याविरोधात अधिकृत तक्रार करणार आहे. त्यानंतर दिल्लीला ईडी, अर्थ मंत्रालय, कंपनी मंत्रालयाकडे हे पुरावे देणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
सोमय्यांच्या आरोपाला मुश्रीफ यांनी काय दिलं उत्तर?
हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत २७०० पानांचा पुरावा असल्याचा दावाही सोमय्यांनी केला. त्यालाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif replied to kirit somaiya) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, 'मी आतापर्यंत ५०-५० कोटींचे अब्रुनुकसानीचे सहा दावे दाखल केले आहेत. आता सातवा दावा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी झाली. गेल्या १७ वर्षांपासून मी राजकारणात आहेत. माझ्यावर कोणी आरोप केला नाही. भाजपसारखे चिक्की घोटाळे आम्ही केले नाही. येत्या दोन आठवड्यात फौजदारी अब्रुनुकसानीची १०० कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करतोय.'
सोमय्यांच्या मुलावर खंडणी वसुलीचा आरोप
भाजपाच्या माध्यमातून आधीपासून बिनबुडाचे राजकीय हेतूने आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या (kirit somaiya) ओळखेले जातात. 2012 पासून मंत्र्यांना, सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले. ह्यात किरीट सोमय्या यांचा समावेश आहे. यात त्यांनी भाजप नेत्यांच्या कंपनीची नाव घेतली होती. त्यामुळे त्यांचे पद गेले, असे नवाब मलिक म्हणाले. यावेळी नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्या मुलाबाबत गंभीर विधान केले. इतरांच्या पोरांवर बोट दाखवता, स्वतःची पोरं काय करतात ते बघा. तुमचा मुलगा कोणाला फोन करतो, खंडणी वसूल करतो. कसे मनी लाँडरिंग करतो, हे लोकांना माहीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.