jayant patil 
महाराष्ट्र बातम्या

अजित पवार गटाचे 'इतके' आमदार संपर्कात, शरद पवार अंतिम निर्णय घेतील; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

कार्तिक पुजारी

मुंबई- अजित पवार गटातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. अनेकांना परत पक्षात यायचं आहे. त्यामुळे त्याबाबत विचार सुरु आहे. अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील, असं पाटील म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'खोलात जाऊन त्यांना अडचणीत आणणं मला योग्य वाटत नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, त्यांची कामे होणे आवश्यक आहे. योग्यवेळ पाहू आणि काय ते जाहीर करु.' जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचं किंवा नाही याबाबत काय निर्णय घेतला जाईल, याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं होतं. यावर ते म्हणाले की 'अंतिम निर्णय राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हेच घेतील.' (NCP jayant patil said about mla of ajit pawar in contact with sharad pawar)

15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांची पुन्हा येण्याची इच्छा आहे.पण, अंतिम निर्णय शरद पवार घेतील. आताच बोलून त्यांना अडचणीत आणणार वाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. शिरुर आणि बारामतीमध्ये खूप काम करायचं आहे, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. पक्ष आणि चिन्ह कोणाचा याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. तसेच आमदार अपात्रता प्रकरणी देखील विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाने ४२ आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT