NCP Jitendra Awhad on party workers stopping chhagan bhujbal speech criticizing sharad pawar in beed sabha politics news  
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांचं भाषण थांबवणाऱ्या बीडकरांना आव्हाडांचा सलाम; म्हणाले, ज्यांचं खाल्लं, प्यायलं...

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा रविवारी पार पाडली. या सभेत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान शरद पवारांवर छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे.

आव्हाडांचा बीडकरांना सलाम

बीड येथील उत्तर सभेत छगन भुजबळ बोलत असताना खाली बसलेल्या नागरिकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. यामुळे भुजबळ यांना भाषण आवरतं घ्यावं लागलं. दरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे कार्यकर्त्यांना गोंधळ घातला आणि भुजबळ यांना भाषण आवरतं घ्यावं लागलं, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यादरम्यान जितेंद्र आव्हाडांनी मात्र सोशल मीडियावर पोस्ट करत बीडकरांना सलाम असं म्हटलं आहे.

"बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!! ज्यांचं खाल्लं, प्यायलं... त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.#Armstrong" असे आव्हाड म्हणाले आहेत.

बीडकरांचा सभेत गोंधळ... नेमकं काय झालं?

बीडमधील सभेत कार्यकर्ते बऱ्याच वेळेपासून अजित पवार यांचे भाषण ऐकण्यासाठी थांबले होते. सभा सर्व नेत्यांच्या भाषणामुळे लांबली आणि मंत्री छगन भुजबळ बोलायला उभे राहिले. मात्र ते बोलत असताना समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. भुजबळांनी दोन मिनिटात भाषण संपवतो, अशी विनंती देखील केली. मात्र कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरुच होता. अजित पवार सर्वात शेवटी बोलेले. त्याआधी छगन भुजबळ भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका सुरू केली. यावेळी खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला.

भुजबळ काय म्हणाले?

"दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तर म्हणे गुगली टाकली होती. राजकारणात अशी गुगली असते का ? गुगलीत स्वत:च्या प्लेअरला आऊट करायचं असतं का?", असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच शरद पवार यांनी येवल्यात सभा घेतली होती, तेव्हा त्यांनी येवल्यातील जनतेची माफी मागितली होती. यावर भुजबळ म्हणाले की, "साहेब म्हणतात, माझी चूक झाली, माफी मागतो. कारण उमेदवार चुकीचा दिला. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागाची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल."

"आमच्यावर ईडीची कारवाई झाली, आम्ही आत गेलो आणि बाहेर येऊन पुन्हा तुमच्यासोबत पुन्हा उभे राहिलो. आम्ही ईडीला घाबरत नाही." असेही भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nagraj Manjule : खाशाबा जाधव चित्रपटाच्या कथेचा वाद! कॉपीराइट कायद्यानुसार नागराज मंजुळे यांना समन्स

Oil Prices : खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ; सोयाबीनला भाव का कमी?; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Best Bikes : चक्क 80 किलोमीटरचे मायलेज अन् किंमत 60 हजारांपेक्षा कमी, या आहेत भारताच्या बेस्ट बाईक

SCROLL FOR NEXT