राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षातील अजित पवार आणि शरद पवार हे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा काल कर्जत येथे मेळावा झाला. या कर्यक्रमात अजित पवारांनी त्यांच्या भाषणात शरद पवार यांच्यावर अनेक आक्षेप घेत वेगवेगळे गौप्यस्फोट केले. यानंतर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी काल रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.
अजित पवार काय म्हणाले होते?
"तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कोणी अडवलं होतं? ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि वाढवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हा निर्णय जरी निवडणूक आयोगाने घेतला असला तरी जनतेला तो पटलाय का? याचाही विचार झाला पाहिजे. अरे तुमच्यात जर धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं" अशा शब्दात अजित पवार हे त्यांच्या जुन्या भाषणात शिंदे गटाला सुनावताना दिसत आहेत.
दरम्यान या व्हिडीओसोबत आव्हाडांनी अजित पवारांना नवीन पक्ष काडण्याचं आव्हान दिलं आहे. तुम्ही दिलेला शब्द पाळाणारा माणूस अशी स्वतःची ओळख करून देता, या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल असेही आव्हाड म्हणाले आहेत.
आव्हाडांनी नेमकं काय म्हटलंय?
"दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी ! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्रजी पावर साहेबांनी दिला, त्याच पालन पोषण ही पवार साहेबांनी केल, त्याच संगोपन पुढे पवार साहेबांनीच केल. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखिल पवार साहेबांमुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात. मग, जस आपण म्हटलात तस घ्याना आणि एक नविन पक्ष काढा, नविन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.