SHARAD PAWAR DILIP WALSE PATIL 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार माणूस, प्रत्यक्षात मात्र...'; वळसेंच्या शरद पवारांवरील टीकेला आव्हाडांचं प्रत्युत्तर

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गटात सामील झालेले दिलीप वळसे पाटील यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकदाही स्वबळावर सत्ता आली नाही, असं विधान केलं. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतल आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वळसे पाटील यांच्या विधानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. "हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला."

"साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले" अशा शब्दात आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल." असेही आव्हाड म्हणालेत.

वळसे पाटील काय म्हणाले?

नवी दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. पण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकदाही स्वबळावर सत्ता आली नाही, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ६० ते ७० आमदारांपेक्षा जास्त आमदार निवडून आले नाहीत.

राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा माझा, अजित पवार किंवा अन्य सहकाऱ्यांचा नव्हता तर बहुसंख्य आमदारांचा होता. ‘विकासकामे होत नसल्याने आमदारांमध्ये चलबिचल व अस्वस्थता सुरू होती. हा विषय आम्ही पवार यांच्याकडे मांडला होता. पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. विचारविनिमय करूनच निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आम्ही भाजपमध्ये गेलो असा नसून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत,’ असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT