Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'कोणाला मुख्यमंत्री पद मिळवायचं असेल तर...'; अजित पवारांचं कार्यकर्त्यांच्या बॅनबाजीनंतर भाष्य

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळा मार्ग निवडत शिवसेना-भाजप सरकारसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या आणि कऱ्हाडच्या दौऱ्यावर येत आहेत. आज कोल्हापूरात त्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान कोल्हापूरकडे कूच करण्याआधी अजित पवारांनी पुण्यात देवदर्शन घेतलं.

कोल्हापूरच्या सभेला मी पुण्यातून निघणार आहेत. यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते कोल्हापूर-सातारा मार्गाने जाताना ते कऱ्हाडला देखील जाणार आहेत.

कोल्हापूर दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी शहरात अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री व्हावे अशी मागणी करणारे बॅनर लावले आहेत. याबद्दल विचारले असाता, अजित पवार म्हणाले की, आलीकडे महाराष्ट्रात नवीन फॅड आलं आहे. राज्यात काही ठिकाणू राज ठाकरेंचे काही ठिकाणी पंकजा मुंडे यांचेही बॅनर लागले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. मागे मुंबईत राष्ट्रवादी भवनच्या बाहेर एक दिवस माझे, एकदीवस जयंत पाटील यांचे तर एक दिवस सुप्रिया सुळेंचे बॅनर लागले. हे काही आम्ही सांगत नाही.

तो नशिबाचा भाग...

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, बॅनर लावून भावी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री होता येत नाही. कोणाला मुख्यमंत्री पद मिळवायचं असेल तर १४५ चं मॅजिक फिगर चा आकडा जो गाठू शकतो तो मुख्यमंत्री होतो. जसं मागे उद्धवजी, देवेंद्रजीनीं गाठला आता एकनाथ शिंदे यांनी गाठला. यावर पत्रकाराने तु्म्ही लेट झालात? असं विचारताच अजित पवार म्हणाले की, लेटचा प्रश्न नाही, मी तसं म्हणणं बरोबर नाही, पण तो नशिबाचा भाग असतो असे अजित पवार म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अद्याप समजावून सांगण्याचं काम कोणी करू शकलं नाही, यामुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या राज्यातील सर्व पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बोलवली आहे, असेही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर आज उत्तरदायित्व जाहीर सभेत अजित पवार बोलणार आहेत. या सभेसाठी जातान ते सातारामार्गे कऱ्हाड येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच मानला जातो. दरम्यान अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Assembly Election: महाविकास आघाडीत संकटातून संधीचा फायदा घेत शरद पवारांनी कसा साधला 'राजकीय डाव'

Stock Market Crash: 40 लाख कोटी बुडाले; दिवाळीपूर्वी शेअर बाजाराची वाईट अवस्था, काय आहे खरे कारण?

Gold Rates: धनत्रयोदशीपूर्वी सोने झाले स्वस्त झाले; चांदीचे भावही घसरले, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव

Mohammed Shami ला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्थान का मिळालं नाही? रोहित शर्मानं सांगितलं कारण

Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

SCROLL FOR NEXT