anil deshmukh sakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh : शंभर कोटींच्या आरोपात अडकलेल्या देशमुखांची तुरुंगात 13 महिने कशी गेली?

शंभर कोटींचा आरोप अन् 13 महिने तुरुंगवास, हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसूलीच्या आरोपाप्रकरणी तुरुंगवास भोगत होते. त्यांना अखेर कोर्टाने दिलासा दिलाय. त्यांंना आज बेल मिळणार आहे. देशमुख यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती द्यावी, अशी याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

तब्बल 13 महिने अनिल देशमुख जेलमध्ये राहले. जरी ते जेलमध्ये होते तरी त्यांच्या चर्चा कायम राहल्या. आज आपण या 13 महिन्याचा थोडक्यात आढावा जाणून घेणार आहोत. (ncp leader Anil Deshmukh release from jail declared bail 100 crore extortion cas)

मार्च 2021 मध्ये मुंबईचे माजी पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचा आरोप लावला होता आणि राज्यात एकच चर्चा रंगली. विशेष म्हणजे ते त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते.

अनिल देशमुखांना कधी अटक झाली होती?

या आरोपानंतर राज्यात चर्चा रंगली होती. अनिल देशमुख यांची चौकशी सुरु झाली आणि अखेर चौकशीदरम्यानच अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती.

अनिल देशमुखांवर होते हे आरोप?

  • 100 कोटी मनी लाँड्रिंग आणि वसुलीचं प्रकरण बरंच गाजलं. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मार्च २०२१ मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वझेकडे दरमहा 100 कोटी रुपयांची वसूली केल्याचा आरोप केला होता.

  • त्यानंतर या प्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.

  • सीबीआय एफआयआरच्या आधारे ईडीने सुद्धा कारवाई केली आहे आणि सीबीआयने देशमुखांवर बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळल्याचा आरोप केला.

  • ईडीने सांगितल्याप्रमाणे वसुलीतील पैशापैकी 4.18 कोटी रुपये दिल्लीतील 4 वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये जमा करण्यात आली होती. या कंपन्यांनी ही रक्कम श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ट्रस्टला दिली विशेष म्हणजे हा ट्रस्ट अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंब चालवतात. त्यामुळे वसुलीचा थेट पैसै देशमुखांच्या ट्रस्टमध्ये वापरला जात होता.

अखेर अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका

  • देशमुख यांनी सुटकेसाठी विशेष सीबीआय न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता मात्र विशेष सीबीआय न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला

  • त्यानंतर देशमुखांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

  • अनिल देशमुख यांनी याचिकेतील वैद्यकीय आणि गुणवत्तेच्या आधारे जामीन देण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने या संदर्भात निर्णय राखून ठेवला होता.

  • मुंबई उच्च न्यायालयातून देशमुख यांना जामीन मंजूर केला होता मात्र, काही मिनिटांनीच न्यायालयाने जामिनावरही स्थगिती दिली होती.

  • सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती द्यावी, अशी याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका आता फेटाळून लावली आहे आणि त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

  • आज ते तुरुंगातून बाहेर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT