राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने मविआतून बाहेर पडण्याचा इशारा ठाकरे गटाला दिला आहे. त्यामुळे राजकीय गोटात पुन्हा मविआमध्ये फूट पडणार अशी चर्चा रंगली आहे. (NCP leader chhagan bhujbal given a warning to get out of MVA )
सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत 'वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.' असा आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मविआतून बाहेर पडण्याचा इशारा दिली आहे. त्यामुळे राऊत यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय म्हणाले भुजबळ?
शरद पवार साहेबांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हणले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग संजय राऊत यांना काय अडचण आहे? संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे ? असे सवाल उपस्थित केले.
तसेच, राऊत यांना असे वाटते का, का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. मतभेद निर्माण व्हावेत. तुमचं जेवढ आयुष्य आहे तेवढं शरद पवार साहेबांचा राजकारण आहे. राष्ट्रवादी मध्ये सुद्धा अजित पवार,सुप्रिया सुप्रिया सुळे,जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत.
ते कुणाच्या घरात गेले होते त्यांनाच माहिती. इतकं लक्ष त्यानी शिंदे गट आणि त्यांच्या बॅगवर ठेवले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. अशी कोपरखळीदेखील भुजबळ यांनी राऊतांना मारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.