महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक आज पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याआधी नवाब मलिक यांनी माध्यमाशी संवाद साधला.
मंत्रिपदाची शपथ घेतल्याशिवाय अधिकृतरीत्या काम करू शकत नाहीत. त्यामुळे याआधी पाच वेळा शपथ घेतलेले नवाब मलिक यांनी आजची मंत्रीपदाची शपथ म्हणजे केवळ औपचारिकता असल्याचं बोलून दाखवलंय. अगदी साध्या पद्धतीने मी शपथ घेणार असल्याचं नवाब मलिक म्हणालेत.
मी कुणाकडे कोणत्याही खात्याची मागणी केलेली नाही. माझ्याकडे जे खातं देण्यात येईल त्याचा कारभार मी सांभाळणार असल्याचं राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी म्हटलंय. आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचं भलं करण्याची आशा नवाब मलिक यांनी माध्यमांना बोलून दाखवली.
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. अशात कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक सक्षम सरकार महाराष्ट्रात असल्याचं मलिक म्हणालेत. दरम्यान महाराष्ट्रातील तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित राहिलेत तर महाराष्ट्रात वेगळं चित्र पाहायला मिळेल. जनतेला न्याय देण्यासाठी मंत्री तर कामं करतात. मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व योजना महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहणं महत्त्वाचं असल्याचं नवाब मलिक म्हणालेत.
मोठी बातमी : 'ही' आहे यंदा सर्वाधिक सर्च करण्यात आलेली अभिनेत्री
घटक पक्षांना नक्कीच निमंत्रण दिलेलं आहे, शेकापचे एक आमदार आहेत, राजू शेट्टी यांचा एक आमदार असणार आहे. राजू शेट्टी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी इच्छा होती. मात्र मंत्रिमंडळात संधी मिळत नसेल तरीही इतर वेगळ्या संधी दिल्या जाऊ शकतात असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.
कोण आहेत नवाब मलिक ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडण्याची म्हणजेच प्रवक्तेपदाची नबाव मलिकच पार पाडतात. मुंबईतल्या अनुशक्तीनगर या मतदार संघातून ते निवडून आले आहेत. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुसऱ्या फळीतील नेते मानले जातात.
WebTitle : NCP leader nawab malik on raju shetty and those who did not get opportunity in ministry
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.